BBC Marathi वरील मागील आठवड्यातले खास लेख, जे कदाचित तुमच्या नजरेतून सुटले असतील

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख आम्ही येथे देत आहोत.

1. पंतप्रधान मोदींची 8 वर्षं: नोटाबंदी ते लॉकडाऊन, 'या' 8 निर्णयांचा तुमच्यावर कसा परिणाम झाला?

नरेंद्र मोदींनी 26 मे 2014 या दिवशी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदाच काँग्रेसव्यतिरिक्त कुठल्या पक्षाला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळालं आणि पहिल्यांदाच काँग्रेसचा इतका दारुण पराभव झाला होता. पक्षाचे उणेपुरे 44 खासदार निवडून आले.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना जितकं स्थैर्य आणि स्वातंत्र्य मिळालं आहे ते यापूर्वी मोजक्याच नेत्यांना मिळालं. या 8 वर्षांत मोदींनी घेतलेल्या निवडक 8 निर्णयांचा आणि त्यांच्या परिणामांचा आढावा या लेखात घेऊया.

2. मंकीपॉक्स बरा होऊ शकतो का? मंकीपॉक्सची लक्षणं काय आहेत?

जगभरात किमान 12 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 80 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.

तर अधिकच्या 50 संशयित रुग्णांची चौकशी सुरू असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. यात आरोग्य संघटनेनं कोणत्याही देशाचं नाव घेतलं नाहीये. तसंच रुग्णांची संख्या वाढू शकते, असा इशाराही संघटनेनं दिला आहे.

नऊ युरोपीय देशांसहित यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलियात मंकीपॉक्सची साथ आली आहे.

मंकीपॉक्स हा दक्षिण आफ्रिकेत आढळणारा आजार आहे. या लिंकवर क्लिक करून मंकी पॉक्स आजाराविषयी अधिक जाणून घेऊया.

3. अमेरिकेत शस्त्रं विकत घेणं इतकं सोपं का आहे?

18 वर्षांच्या एका मुलाने अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात एका प्राथमिक शाळेवर हल्ला केला आणि त्यात 19 मुलांचा आणि 2 जणांचा मृत्यू झाला.

ज्या वयात आपल्याकडे गिअरच्या गाडीचं पक्कं लायसन्स मिळतं त्या वयात या मुलाकडे रायफल आली कुठून?

उघडपणे बंदुका बाळगण्याचं स्वातंत्र्य अमेरिकेत का आहे? तिथे खरंच किराणा दुकानांमध्ये बंदुका विकत मिळतात का?

4. जुगजुग जियो : पाकिस्तानी गायकाने करण जोहरला का धमकी दिली?

चित्रपट निर्माते करण जोहर यांचा 'जुगजुग जियो' चित्रपट वादात अडकला आहे. रविवारी, 22 मे रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या वादाचा संबंध पाकिस्तानशी आहे आणि याच्या केंद्रस्थानी आहे 'नच पंजाबन' हे गाणं.

पाकिस्तानी गायक अबरार उल हक यांचा आरोप आहे की त्यांनी कोणत्याही भारतीय चित्रपट निर्मात्याला 'नच पंजाबन' या गाण्याच्या वापराची परवानगी दिलेली नाही.

5. दिनेश कार्तिक: घटस्फोट, नैराश्य, फेक न्यूज- दिनेश कार्तिकच्या आयुष्यात खरंच हे घडलंय?

दिनेश कार्तिक कालातीत माणूस आहे. तो 'प्रेझेंट कंटिन्यूअस' सदरात मोडतो. दिवस-महिने-वर्ष पुढे सरकतात. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो.

पावसाळ्याकडून मशाल घेऊन हिवाळा येतो. हिवाळ्याकडून ऊर्जा घेऊन पुन्हा उन्हाळा येतो. कोरोनाची पहिली लाट येते, दुसरी लाट येते. स्पर्धा होत राहतात.

विजयाचे गोडवे गायले जातात, पराभवाची मीमांसा केली जाते. दिनेश कार्तिक नांगर टाकून उभा असतोच. लिंकवर क्लिक करून वाचा संपूर्ण लेख -

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)