You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC Marathi वरील मागील आठवड्यातले खास लेख, जे कदाचित तुमच्या नजरेतून सुटले असतील
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख आम्ही येथे देत आहोत.
1. ज्ञानवापी मशीद प्रकरण: 10 प्रश्न आणि 10 उत्तरं
काशीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर हिंदू मूर्ती आहेत आणि तिथे प्रार्थना करण्याची परवानगी मिळाली अशी याचिका पाच महिलांनी केली.
प्रकरण कोर्टात गेलं. सुनावणी झाली. मशिदीचं सर्वेक्षण झालं आणि आता तिथं शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे.
आता प्रकरण कोर्टात गेलं आहे. पण हा बाबरीप्रमाणेच ज्ञानवापी मशिदीचाही वाद आहे का?
औरंगजेबाने विश्वनाथ मंदिर पाडून तिथे मशीद बांधली असं म्हणतात यात किती तथ्य आहे? या लिंकवर क्लिक करून जाणून घ्या ज्ञानवापी प्रकरणातील 10 प्रश्नांची उत्तरं...
2. निखत झरीनशी हात मिळवणं मेरी कोमनं टाळलं होतं, कारण...
निखत झरीन ने इस्तांबूलमध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 52 किलो गटात सुवर्णपदक मिळवलं आहे.
तिने थायलंडच्या जिटपोंग जुटामस यांचा पराभव केला.
बुधवारी तिने ब्राझीलच्या कॅरोलिना डी अलमेडा चा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. हा विजय मिळवणारी ती पाचवी भारतीय महिला ठरली आहे.
ट्विटरवर ट्रेंड होत असल्यामुळे निखत आज खूप खूष आहे. आज ती जिंकल्यामुळे ट्विटरवर ट्रेंड होतेय. पण 2019 मध्ये मात्र तिला ट्विटरवर चांगलंच ट्रोल केलं जात होतं. काय आहे हा किस्सा? लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या...
3. तुमच्या-आमच्या ताटातली चपाती आतातरी स्वस्त होईल का?
भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ स्वरूपात बंदी घातली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन भारत सरकारने हा निर्णय घेतलाय. यासंदर्भातील अधिसूचनाही सरकारने काढली आहे.
भारतासह शेजारील देश आणि इतर गरजू देशांच्या अन्नसुरक्षेला धोका उत्पन्न झाल्याचं अधिसूचनेत म्हटलंय.
"देशाच्या एकूण अन्नसुरक्षेचे व्यवस्थापन करण्यासाठी, शेजारच्या आणि इतर गरजू देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी" हे पाऊल उचलण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे. या निर्णयामुळे खरंच आपल्या ताटातली चपाती स्वस्त होईल का? लिंकवर क्लिक करा आणि वाचा संपूर्ण बातमी.
4. प्रवीण तरडे ज्यांची भूमिका साकारत आहेत ते हंबीरराव मोहिते कोण होते?
'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट' असं एक वाक्य 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाच्या टीजरमध्ये मुख्य व्यक्तिरेखेच्या म्हणजेच हंबीरराव मोहिते यांच्या तोंडी आहे. हे वाक्य ऐकल्यावर आपल्या लक्षात येतं की हंबीररावांना आपल्या आयुष्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागला पण त्याला त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले. पण एक उत्सुकताही लागते की त्यांचे आयुष्य नेमके कसे होते.
27 मे रोजी हा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटानंतर घराघरात पोहोचलेले प्रवीण तरडे हेच स्वराज्याचे सरसेनापती सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
ज्यावेळी 'सरसेनापती हंबीरराव'चे टिजर प्रदर्शित झाले त्यावेळी बाहुबली प्रभासने देखील या चित्रपटाच्या टिजरची स्तुती केली.
अनेकांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. पण त्याचबरोबर अनेकांना हंबीरराव मोहिते नेमके कोण होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य सेनेचे ते सरसेनापती कसे बनले? इथे क्लिक करा आणि जाणून घ्या.
5. महागाईचा उच्चांक, रुपया ढासळल्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?
गेल्या काही महिन्यांपासून फळ, भाज्या आणि दुधासह खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झालीय. मंगळवारी समोर आलेली आकडेवारी ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तसंच सर्वसामान्यांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. एप्रिल महिन्याचा घाऊक महागाईचा निर्देशांक (WPI) 15.08 % राहिला. गेल्या 9 वर्षांतील हा उच्चांक आहे.
घाऊक महागाई निर्देशांक गेल्या 13 महिन्यांपासून डबल डिजिट म्हणजेच दुहेरी आकड्यांतच वाढत आहे. पण याचा नेमका काय अर्थ होतो. त्याचा तुमच्या खिशावर नेमका काय परिणाम होईल? लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या सविस्तर माहिती.
6. नवज्योतसिंग सिद्धू यांना 1 वर्षाचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण?
पंजाबचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धू यांनी 1988 साली एका गुरनाम नामक व्यक्तीला मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
तब्बल 34 वर्षे जुन्या असलेल्या या प्रकरणात अनेक वळणे पाहायला मिळाली. सर्वप्रथम या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये निकाल दिला होता. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सिद्धू यांच्यावरील सदोष मनुष्यवधाचा आरोप फेटाळून लावताना त्यांची तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा बदलून एक हजार रुपयांचा दंड लावला होता. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)