IPL 2022 : 2 नवे संघ, 3 नवे कर्णधार, 236 खेळाडू

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

इंडियन प्रीमिअर लीगचा 15वा हंगाम काही दिवसातच सुरू होत आहे. हंगामापूर्वी झालेल्या लिलावानंतर सर्वच संघांचा चेहरामोहरा पालटला आहे. स्पर्धा आता आठऐवजी दहा संघांची झाली आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, चेन्नईने महेंद्रसिंग धोनी तर सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनच्या नेतृत्वच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने ऋषभ पंत हाच कायमस्वरुपी कर्णधार असेल यावर शिक्कामोर्तब केलं.

कोलकाताने श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. पंजाबने मयांक अगरवालकडे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने फॅफ डू प्लेसिसकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मयांक आणि फॅफ हे अनेक वर्षं आयपीएलमध्ये खेळत असले तर पहिल्यांदाच त्यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.

राजस्थान रॉयल्सकडे कर्णधारपदासाठी जोस बटलर, रवीचंद्रन अश्विन असे पर्याय होते मात्र त्यांनी संजू सॅमसनच्या नावालाच पसंती दिली आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स संघांनी अनुक्रमे हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल यांच्याकडे कर्णधारपद सोपवलं आहे.

आयपीएल खेळू लागल्यापासून मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाचा अनुभव नाही. दुखापतीमुळे तो प्रदीर्घ काळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून लांब राहिला आहे. दुसरीकडे के. एल. राहुलने पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व केलं आहे. भारतीय संघाचं कर्णधारपदही भूषवलं आहे. लखनऊचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत खेळत असला तरी राहुलकडे आयपीएल कर्णधारपदाचा पुरेसा अनुभव आहे.

रैनाला डच्चू, डूप्लेसिसची कमतरता; दीपक खेळणार का?

सुरेश रैनाला ताफ्यात समाविष्ट न करत चेन्नईने सगळ्यांना धक्का दिला. लिलावात कमी रक्कम हातात असल्यामुळे चेन्नईला त्यांचा भरवशाचा अनुभवी खेळाडू फॅफ डू प्लेसिसला संघात समाविष्ट करता आलेलं नाही. शार्दूल ठाकूर, जोश हेझलवूड, लुंगी एन्गिडी हे तिघे संघाबाहेर गेल्याने चेन्नईची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. तब्बल 14 कोटी रुपये खर्चून चेन्नईने दीपक चहरला संघात कायम राखलं, पण दुखापतीमुळे तो किती सामने खेळू शकेल याबाबत साशंकता आहे.

चेन्नई सुपर किंग्स-महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मोईन अली, के.आसिफ, भगत वर्मा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगारगेकर, हरी निशांथ, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिलने, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरस, अंबाती रायुडू, मिचेल सँटनर, सुभ्रांशू सेनापती, सिमरजीत सिंग, प्रशांत सोळंकी, महेश ठीकसाना, रॉबिन उथप्पा.

प्रशिक्षक- स्टीफन फ्लेमिंग, माईक हसी, लक्ष्मीपती बालाजी, राजीव कुमार

ताकदवान दिल्ली

लिलावात अतिशय आक्रमकतेने उतरलेल्या दिल्लीने अतिशय कमी रकमेत डेव्हिड वॉर्नरसारख्या मोठ्या खेळाडूला ताफ्यात समाविष्ट केलं. दिल्लीने शिखर धवन, रवीचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर, कागिसो रबाडा, मार्कस स्टॉइनस यांना रिलिज केलं.

दिल्लीने तुफान फॉर्मात असलेल्या सर्फराझ खानला संघात समाविष्ट केलं आहे. अष्टपैलू मिचेल मार्श दिल्लीसाठी हुकूमी एक्का ठरू शकतो. अँनरिक नॉर्किया खेळू शकणार का याविषयी संदिग्धता आहे. U19 संघाचा कर्णधार यश धूल दिल्लीकडे आहे.

दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत, खलील अहमद, अश्विन हेब्बार, के. एस. भरत, यश धूल, प्रवीण दुबे, सर्फराझ खान, कुलदीप यादव, ललित यादव, मनदीप सिंग, मिचेल मार्श, मुस्ताफिझूर रहमान, कमलेश नागरकोट्टी, लुंगी एन्गिडी, अँनरिक नॉर्किया, विकी ओत्सवाल, रिपल पटेल, अक्षर पटेल, रोव्हमन पॉवेल, चेतन साकरिया, टीम सैफर्ट, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर, डेव्हिड वॉर्नर.

प्रशिक्षक- रिकी पॉन्टिंग, शेन वॉटसन, जेमी होप्स, प्रवीण अमरे, अजित आगरकर

नवा भिडू

गुजरात टायटन्स संघाचं हे आयपीएल पदार्पण आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या हार्दिक पंड्याला गुजरातने कर्णधार म्हणून निवडलं आहे. शुबमन गिल आणि रशीद खान यांच्या खांद्यावर गुजरातची भिस्त आहे.

डेव्हिड मिलर, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी हे गुजरातसाठी महत्त्वाचे खेळाडू आहेत. गुजरातला फलंदाजी बळकट करावी लागणार आहे. रहमतुल्ला गुरबाझ आणि मॅथ्यू वेड अंतिम अकरात दिसू शकतात.

गुजरात टायटन्स- हार्दिक पंडया (कर्णधार), वरुण आरोन, डॉमिनिक ड्रेक्स, लॉकी फर्ग्युसन, गुरकीरत सिंग मान, अल्झारी जोसेफ, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी, दर्शन नालकांडे, नूर अहमद, हार्दिक पंड्या, रहमतुल्ला गुरबाझ, रशीद खान, वृद्धिमान साहा, आर.साई किशोर, साई सुदर्शन, प्रदीप संगवान, विजय शंकर, शुबमन गिल, राहुल टेवाटिया, मॅथ्यू वेड, जयंत यादव, यश दयाळ.

प्रशिक्षक- आशिष नेहरा, विक्रम सोळंकी, गॅरी कर्स्टन, आशिष कपूर

नवा कर्णधार, नवी सुरुवात

कोलकाताने कात टाकून नव्याने संघबांधणी करायचं ठरवलं आणि तसं केलंही. आयोन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक या कर्णधारांना कोलकाताने डच्चू दिला. श्रेयस अय्यरच्या रुपात कोलकाताने पुढील अनेक वर्षांसाठी चांगला कर्णधार मिळवला आहे. आंद्रे रसेल दुखापतग्रस्त असल्यास मोहम्मद नबीचा पर्याय कोलकाताला खुला झाला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स - श्रेयस अय्यर (कर्णधार), अमन खान, अशोक शर्मा, सॅम बिलिंग्ज, पॅट कमिन्स, आरोन फिंच, बाबा इंद्रजीत, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, चामिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, सुनील नरिन, प्रथम सिंग, अजिंक्य रहाणे, रमेश कुमार, नितीश राणा, रसिक सलाम, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, शिवम मावी, रिंकू सिंग, टीम साऊदी, अभिजीत तोमर, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव.

प्रशिक्षक- ब्रेंडन मॅक्युलम, अभिषेक नायर, डेव्हिड हसी, ओंकार साळवी, जेम्स फोस्टर, भरत अरुण, ख्रिस डोनाल्डसन

संतुलित संघासह पदार्पण

पुणे सुपरजायंट्स संघाचे मालक असलेल्या गोएंका यांनीच लखनऊ सुपरजायंट्स संघ विकत घेतला. क्रिकेटची आवड असणाऱ्या गोएंका यांनी चांगल्या प्रशिक्षकांसह उत्तम संघबांधणी केली आहे.

लोकेश राहुल लखनौचा कर्णधार आहे. जेसन होल्डर, मार्कस स्टॉइनस, दीपक हुडा, कृणाल पंड्या यांच्या रुपात अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत. अनुभवी मनीष पांडे लखनौच्या योजनांचा महत्त्वाचा भाग आहे.

लखन सुपरजायंट्स- के.एल. राहुल (कर्णधार), अवेश खान, आयुष बदोनी, दुश्मंत चमीरा, क्विंटन डी कॉक, कृष्णप्पा गौतम, जेसन होल्डर, दीपक हुडा, एविन लुईस, कायले मेयर्स, मोहसीन खान, शाहबाझ नदीम, मनीष पांडे, कृणाल पंड्या, अंकित राजपूत, रवी बिश्नोई, करण शर्मा, मार्कस स्टॉइनस, मनन व्होरा, मयांक यादव.

प्रशिक्षक- अँडी फ्लॉवर, विजय दहिया, गौतम गंभीर, रिचर्ड हालसाल, अँडी बिकेल, वॉरेन अँड्यूज

मुंबईची नवी पलटण

लिलावात मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी प्रचंड गंगाजळी खर्च केली. मुंबईने हार्दिक आणि कृणाल पंड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक यांना रिलीज केलं.

तडाखेबंद फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा टीम डेव्हिडकडून मुंबईला खूप अपेक्षा आहेत. मुंबईने जोफ्रा आर्चरला ताफ्यात घेतलं आहे, पण तो हा हंगाम खेळणार नाही. डॅनियल सॅम्स, रिले मेरडिथ आणि टायमल मिल्स हे वेगवान गोलंदाजाचं त्रिकुट मुंबईतल्या खेळपट्ट्यांवर फायदेशीर ठरू शकतात.

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), फॅबिअन अॅलन, अनमोलप्रीत सिंग, जोफ्रा आर्चर, अर्शद खान, मुरुगन अश्विन, बसिल थंपी, डेवाल्ड ब्रुईस, राहुल बुद्धी, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, इशान किशन, आर्यन जुयाल, मयांक मार्कंडेय, रिले मेरडिथ, टायमल मिल्स, कायरेन पोलार्ड, रमनदीप सिंग, डॅनियल सॅम्स, संजय यादव, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.

प्रशिक्षक- माहेला जयवर्धने, सचिन तेंडुलकर, झहीर खान, शेन बॉन्ड, रॉबिन सिंग, जेम्स पमेन्ट, पॉल चॅपमन

नवा नेता पंजाबचं नशीब बदलवणार?

पंजाबने मयांक अगरवालकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. लिलावात सर्वाधिक रक्कम पंजाबकडे होती. त्यांनी शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा यांना समाविष्ट करण्यासाठी पैसा खर्च केला.

इंग्लंडचा लायम लिव्हिंगस्टोन उपयुक्त ठरू शकतो. अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, रिशी धवन हे भारतीय खेळाडू पंजाबसाठी कळीचे ठरू शकतात. फिनिशर म्हणून ओळख प्रस्थापित केलेला शाहरुख खान पंजाबची ताकद आहे.

पंजाब किंग्ज- मयांक अगरवाल (कर्णधार), वैभव अरोरा, अर्शदीप सिंग, जॉनी बेअरस्टो, बलतेज सिंग, राज बावा, राहुल चहर, वृथिक चॅटर्जी, रिशी धवन, शिखर धवन, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, बेनी हॉवेल, लायम लिव्हिंगस्टोन, प्रेरक मंकड, अंश पटेल, इशान पोरेल, प्रभसिमरन सिंग, कागिसो रबाडा, भानुका राजपक्सा, संदीप शर्मा, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, अथर्व तायडे.

प्रशिक्षक- अनिल कुंबळे, ज्युलियन वूड, डेमियन राईट, जॉन्टी ऱ्होड्स, प्रभाकर बेरगोंड, अँड्रियन ली रॉक्स

प्रयोग यशस्वी होण्यासाठी

भारतीय खेळाडूंना संधी देण्यासाठी प्रसिद्ध राजस्थानने रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, शिमोरन हेटमायर, नॅथन कोल्टिअर नील यांना समाविष्ट करत संघ बळकट केला आहे.

यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पड्डीकल ही युवा जोडगोळी आश्वासक आहे. संजू सॅमसन, जोस बटलर हे अनुभवी खेळाडू आहेतच. प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी यांच्यासह रायन पराग राजस्थानसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.

राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (कर्णधार), अनुनय सिंग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, जोस बटलर, के. सी. करिअप्पा, युझवेंद्र चहल, नॅथन कोल्टिअर नील, शुभम गहवाल, शिमोरन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, ओबेड मेकॉय, डॅरेल मिचेल, करुण नायर, जेम्स नीशाम, देवदत्त पड्डीकल, रायन पराग, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, कुलदीप सेन, तेजस बरोका, रासी व्हॅन डर डुसे, कुलदीप यादव.

प्रशिक्षक- कुमार संगकारा, झुबिन भरुचा, ट्रेव्हर पेनी, अमोल मुझुमदार, साईराज बहुतुले, लसिथ मलिंगा, दिशांत याग्निक, स्टेफान जोन्स, पॅडी उप्टन

डू प्लेसिसची जादू चालणार?

खंडप्राय कालावधीनंतर विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स जोडीचा ब्रोमान्स आयपीएलदरम्यान अनुभवता येणार नाही. विराटने कर्णधारपद सोडलं आहे तर एबीने निवृत्ती घेतली आहे. इतकी वर्ष खेळूनही जेतेपदापासून दूर राहिलेल्या बंगळुरूने फॅफ डू प्लेसिसकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लेन मॅक्सवेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वानिंदू हासारंगा हे बंगळुरूचे आधारस्तंभ आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- फाफ डू प्लेसी (कर्णधार), आकाश दीप, फिन अॅलन, अनुज रावत, जेसन बेहनड्रॉफ, वानिंदू हासारंगा, अनीश्वर गौतम, जोश हेझलवूड, दिनेश कार्तिक, सिद्धार्थ कौल, विराट कोहली, महिपाल लोमरुर, ग्लेन मॅक्सवेल, चामा मिलिंद, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, सुयश प्रभुदेसाई, शेरफन रुदरफोर्ड, शाहबाझ नदीम, करण शर्मा, लुवनिथ सिसोदिया, डेव्हिड विली.

प्रशिक्षक- माईक हेसन, संजय बांगर, श्रीधरन श्रीराम, अॅडम ग्रिफीथ, मालोअन रंगराजन

वादबंडाळ्या मागे ठेऊन हैदराबादची नवी इनिंग्ज

अंतर्गत बंडाळ्यांचा सामना करणाऱ्या हैदराबादने कर्णधार डेव्हिड वॉर्नरलाच डच्चू दिला. केन विल्यसमनच्या बरोबरीने निकोलस पूरनकडून हैदराबादला मोठ्या अपेक्षा आहेत. राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर या दोघांसह अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, अब्दुल समद, उमरान मलिक, कार्तिक त्यागी, टी. नटराजन हे भारतीय खेळाडू हैदराबाद संघाचा अविभाज्य भाग आहेत. चांगल्या फॉर्मात असलेला मार्को यान्सन हैदराबादसाठी निर्णायक ठरू शकतो.

सनरायझर्स हैदराबाद- केन विल्यमसन (कर्णधार), शॉन अबॉट, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, सौरभ दुबे, फझलक फारुकी, प्रियम गर्ग, श्रेयस गोपाळ, मार्को यान्सन, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, एडन मारक्रम, टी.नटराजन, ग्लेन फिलीप्स, निकोलस पूरन, रवीकुमार समर्थ, शशांक सिंग, रोमारिओ शेफर्ड, जगदीश सुचिथ, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, विष्णू विनोद, वॉशिंग्टन सुंदर.

प्रशिक्षक- टॉम मूडी, ब्रायन लारा, डेल स्टेन, मुथय्या मुरलीधरन, हेमांग बदानी

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)