मणिपूर विधानसभा निवडणूक : कधी आहे मतदान? कोणते पक्ष आहेत रिंगणात?

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

देशात 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मणिपूरमध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठीचं मतदान होईल. 10 मार्चला या सगळ्या राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल लागतील.

मणिपूरमध्ये कधी आहे मतदान?

मणिपूर विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.

मतदानाचा पहिला टप्पा : 28 फेब्रुवारी

मतदाना दुसरा टप्पा : 5 मार्च

मणिपूर विधानसभेची रचना

मणिपूर विधानसभेमध्ये एकूण 60 जागा आहेत. बहुमत मिळण्यासाठी 31 किंवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याची आवश्यकता आहे.

मणिपूर राज्यातल्या 60 मतदार संघांपैकी 40 मतदारसंघ हे दऱ्यांमधल्या भागांमध्ये आहेत तर 20 मतदारसंघ डोंगराळ भागात आहेत.

2017 निवडणुकीत काय झालं होतं?

2017च्या निवडणुकीत काँग्रेसने 28 जागा जिंकल्या तर भाजपला मणिपूरमध्ये 21 जागांवर विजय मिळाला.

भाजपने नॅशनल पीपल्स पार्टी (National People's Party - NPP), नागा पीपल्स फ्रंट (Naga People's Front - NPF) आणि लोक जनशक्ती पार्टी (Lok Janshakti Party - LJP) सोबत आघाडी केली आणि सत्तेसाठी दावा केला.

एन. बिरेन सिंह यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपने 2017मध्ये पहिल्यांदाच मणिपूरमध्ये सरकार स्थापन केलं.

त्या आधी 15 वर्षं मणिपूरमध्ये काँग्रेसचं सरकार होतं.

कोणते पक्ष निवडणूक लढवत आहेत?

भाजप राज्यात सर्व 60 जागांवर निवडणूक लढवत आहे. सध्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे हिंगांग मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेस 54 जागी निवडणूक लढवतंय.

नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) 42 जागांवर, जनता दल (युनायटेड) 38 जागी, नागा पीपल्स फ्रंट (NPP) 10 विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)