लता मंगेशकर यांना कोरोना, रुग्णालयात दाखल

लता मंगेशकर

फोटो स्रोत, GAUTAM RAJADHYAKSHA COLLECTION

फोटो कॅप्शन, लता मंगेशकर
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लता मंगेशकर यांची भाची रचना यांनी एएनआयला यासंदर्भात माहिती दिली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना सौम्य लक्षणं जाणवत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचं वय लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे," असं रचना यांनी सांगितलं.

2019 मध्ये श्वास घ्यायला त्रास जाणवल्याने लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मुंबईत सोमवारी कोरोनाचे 13,648 रुग्ण आढळले. मुंबईत 27,214 रुग्णांना बरं झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं. रविवारच्या तुलनेत 70 टक्के रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.

मुंबईत सलग तीन दिवस कोरोना रुग्णांची संख्या 20हजारच्या पुढे होती. सोमवारी हा आकडा कमी झाला. रुग्णांची संख्या कमी असण्याचं कारण कमी चाचण्या असंही सांगितलं जात आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)