करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण

फोटो स्रोत, Getty Images
अभिनेत्री करिना कपूर कोरोना आणि अमृता अरोरालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना चाचणी केल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याविषयी बोलताना म्हटलं, "करिना कपूर आणि अमृता अरोरा पॉझिटिव्ह आल्या आहेत. काही लोक अजून नियम पाळताना दिसत नाहीत.
"दोन्ही अभिनेत्रींच्या कुटुंबीयांना तपासलं जात आहे. आपण बाहेर जातो पण घरी असलेल्या सदस्याचा विचार करा. राजकीय लोकांनी सुद्धा नियम पाळावेत."
31 डिसेंबरविषयी बोलताना पेडणेकर म्हणाल्या, "25 डिसेंबर ते 31 डिसेंबरला गर्दी होऊ नये. पालिकेने पार्टीच्या मुक्त परवानग्या देऊ नयेत, अशी आयुक्तांना विनंती केलीये. आता थर्टी फस्त येते आहेत. हॉटेल चालकांनी काळजी घ्यावी."
"हॉटेलचालक नियम पाळत नसतील, तर तुमचे लायसन्स का रद्द केले जाऊ नयेत? नियम पाळणं हॉटेलधारकांचीही जबाबदारी आहे," असंही पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरीएंटची प्रकरणं वाढत असल्याचं पाहून भारतातही सतर्कता राखली जात आहे.
आतापर्यंत भारतात ओमिक्रॉनची जवळपास 40 प्रकरणं समोर आली आहेत. तर गेल्या 24 तासांत कोरोनाची नवीन 7350 प्रकरणं आढळली आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रकरणं केरळची आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























