पुलाखाली अडकलेल्या एअर इंडियाच्या विमानाचं सत्य

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

दिल्लीमध्ये एका पादचारी पुलाखाली अडकलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा व्हीडिओ व्हायरल झालाय.

वापरात नसलेलं हे विमान भंगारात विकण्यात आलं होतं आणि ते एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना पुलाखाली अडकल्याचं सांगण्यात येतंय.

पंख काढलेलं हे विमान पुलाखाली अडकलं असून शेजारून वाहतूक सुरू असल्याचं या व्हीडिओत पाहायला मिळतं.

अशोक राज या ANI च्या पत्रकाराने या विमानाचा व्हीडिओ ट्वीट केला.

या विमानाबद्दल एअर इंडियाने दिलेली माहितीही त्यांनीच ट्वीट केली आहे.

एअर इंडियाने म्हटलंय, "हे एअर इंडियाचं नोंदणी हटवण्यात आलेलं भंगारात विकण्यात आलेलं विमान आहे. नवीन मालकांद्वारे ते काल रात्री एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलं जात होतं. एअर इंडियाचा आता या विमानाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही."

"हे विमान दिल्ली विमानतळावरच्या विमान ताफ्यातलं नसून चालकाने हे विमान वाहून नेताना चूक केली असल्याचं," दिल्ली विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलंय.

ट्विटर आणि युट्यूबर आतापर्यंत हजारो जणांनी हा व्हीडिओ पाहिला असून आपणही अडकलेलं हे विमान पाहिल्याचं काहींनी म्हटलं आहे.

तर हे विमान वाहून नेताना आधी पाहणी करायला हवी होती, असं मत काहींनी व्यक्त केलंय.

तर एअर इंडियाचं हे विमान पाहून काहीजणांना 2019मध्ये पश्चिम बंगालमध्ये पुलाखाली अडकलेल्या विमानाची आठवण आली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)