'लखोबा लोखंडे' कोण होता? आधीचा, तेव्हाचा आणि आताचा?

'लखोबा लोखंडे' कोण होता? आधीचा, तेव्हाचा आणि आताचा?

फोटो स्रोत, TWITTER/prashantsaykar

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

13 मे रोजी 'लखोबा लोखंडे' नावाच्या सोशल मीडिया हॅन्डलवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल हा गुन्हा नोंदविण्यात आला.

पुणे 'सायबर सेल' ने या लखोबा लोखंडेच्या मागे असलेल्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी अटक केली. त्यानंतर 'लखोबा लोखंडे' हे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होतंय.

नाटकात ऐकलेलं लखोबा लोखंडे हे पात्र अचानक का चर्चेत आलं? कोण आहे सोशल मीडियावरचा लखोबा लोखंडे? त्याने लखोबा लोखंडे हे नाव का वापरलं? त्याची पार्श्वभूमी काय आहे? याबाबतचा हा आढावा...

सोशल मीडियावरचा लखोबा लोखंडे कोण आहे?

35 वर्षीय अभिजीत लिमये या व्यक्तीने सोशल मीडियावर 'लखोबा लोखंडे' नावाचं 'हॅन्डल' सुरू केलं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात येत होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाईची मागणी केली होती. 13 मे रोजी याबाबतीत पुणे सायबर सेलने गुन्हा दाखल केला.

"मला पकडून दाखवणार्‍यांना 100 कोटी रूपयांचं बक्षीस देणार" असं आव्हान लखोबा लोखंडे या हॅन्डलवरून देण्यात आलं होतं.

18 सप्टेंबरला अभिजीत लिमये यांना त्यांच्या माहीमच्या घरातून अटक करण्यात आली. पुणे कोर्टात लिमये यांना 19 सप्टेंबरला हजर करण्यात आलं. त्यावेळी त्यांना जामीन मंजूर झाला.

अभिजीत लिमये यांची सुटका होऊन ते बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'लखोबा लोखंडे' हे 'सोशल मीडिया हॅन्डल' भाजपशी संबंधित असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी थेट तसा आरोप केला आहे. शिवाय आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मदत केल्याचा आरोपसुद्धा चाकणकर यांनी केला आहे.

भाजपच्या आयटी सेलच्या पदाधिकाऱ्यांशी बीबीसी मराठीने याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

'कोर्टाने अभिजीत लिमये यांना जामीन दिला. तरीही शिवसैनिकांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं,' याबाबत भाजपने निषेध व्यक्त केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

कितीही लखोबा लोखंडे आले तरी महाविकास आघाडी अभेद्य असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करून म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

कोण होता तेव्हाचा 'लखोबा लोखंडे'?

'माधव काझी' या खर्‍या गुन्हेगारावर आचार्य अत्रे यांनी 'तो मी नव्हेच' हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकावर आधारित त्याच नावाचं नाटक रंगभूमीवर आलं. या नाटकात प्रभाकर पणशीकर यांनी पाच वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकी एक लखोबा लोखंडेचं पात्र होतं.

प्रतिनिधीक फोटो

फोटो स्रोत, IndiaPix/IndiaPicture

फोटो कॅप्शन, प्रतिनिधीक फोटो

या नाटकात लखोबा लोखंडे हा निप्पाणीचा तंबाखू व्यापारी दाखवण्यात आला होता. पण त्याने विविध सोंग घेऊन, कित्येक महिलांना लग्नाची स्वप्न दाखवून लुबाडलं होतं. अनेकांना पैसे घेऊन फसवलं होतं. पण जेव्हा लखोबा लोखंडे या पात्राला कोर्टात उभं केलं जातं, तेव्हा साक्षीदारांना उलट सुलट प्रश्न विचारून संभ्रमात टाकून स्वतः ची सुटका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लखोबा लोखंडेची वृत्ती यातून दाखवण्यात आली होती. 52 वर्षांत या नाटकाचे 3000 प्रयोग झाले आहेत. या नाटकातल्या खलनायकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.

'लखोबा लोखंडे' हे पात्र राजकीय टीकांसाठी वापरलं गेलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना अनेकदा त्यांना 'लखोबा लोखंडे' म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)