You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : Zydus Cadila च्या लशीला भारतात आपात्कालीन वापराची परवानगी
कोरोनावरील आणखी एका लशीला भारत सरकारनं परवानगी दिलीय. ZyCoV-D असं या लशीचं नाव आहे.
झायडस कॅडिला कंपनीनं तयार केलेल्या या लशीला आज (20 ऑगस्ट) भारत सरकारच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलीय.
विशेष म्हणजे, 12 वर्षांवरील मुलं आणि प्रौढांना ही लस देता येणार आहे. 12 वर्षांवरील व्यक्तींसाठीची ही पहिलीच लस आहे. भारतात आधी आपत्कालीन परवानगी देण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डसह सर्व लशी 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी आहेत.
झायडस कॅडिलाच्या ZyCoV-D लशीच्या तीन टप्प्यात चाचण्या झाल्या असून, 66.6 टक्के इतकी ही लस प्रभावी आढळली. एकूण 28 हजार स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी घेण्यात आली.
DNA वर आधारित असलेली जगभरातील ही पहिली लस असून, DBT-BIRAC च्या मदतीनं झायडस कॅडिलानं ही लस तयार केलीय.
या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील. लस दिल्यानंतर कोव्हिड-19 चे स्पाईक प्रोटीन शरीरात तयार होतील, असं कंपनीनं म्हटलंय. तसंच, या लशीच्या चाचणीदरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाल्याचंही कंपनीनं म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)