कोरोना लॉकडाऊन: पुण्यातले निर्बंध शिथिल, हे आहेत नवीन नियम

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुण्यात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. उप-मुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा केली.

दुकानं, आस्थापनं सुरू असावीत यासाठी पुण्यातील दुकानदारांनी आंदोलन केलं होतं.

मुंबईला एक न्याय तर पुण्याला दुसरा न्याय का, असं म्हणत पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी शहरात घंटानाद आंदोलन केलं. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनलॉकची घोषणा केली आहे.

पुण्यात नेमकं काय आणि केव्हा सुरू असेल?

  • सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरू राहतील.
  • हॉटेलं रात्री 10 वाजेपर्यंत उघडी असतील
  • शनिवार-रविवारी सर्व सेवांना दुपारी 4 पर्यंत परवानगी
  • बगीचे सकाळ आणि संध्याकाळ वेळेत सुरू राहतील.
  • मॉल रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश
  • जलतरण आणि निकटसंपर्क खेळ वगळता अन्य खेळांना परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात येईल असं अजित पवार म्हणाले. पुण्याच्या ग्रामीण भागात लेव्हल3 चे नियम लागू असतील.

प्रत्येकाने मास्क वापराने अनिवार्य आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

तिसरी लाट दुर्देवाने आल्यास, राज्यातच ऑक्सिजन प्लांट असावेत यासाठी तयारी करण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. राज्यात 19 ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)