FYJC 11th Admission : आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू, 'इथे' वाचा संपूर्ण प्रक्रिया

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ. 11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत.

सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. वरील पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.

14 ऑगस्ट पासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

अशी असेल ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :

  • 14 ते 22 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्ज भाग - 1 भरता येईल.
  • विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाची पडताळणी करण्यासाठी जवळच्या कॉलेज किंवा मार्गदर्शक केंद्रावर जाता येईल.
  • 17 ऑगस्ट सकळी 10 वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरता येईल.
  • यात विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी पसंती प्राधान्यानुसार द्यायची आहेत.
  • विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती देण्यात येईल.
  • 23 ऑगस्ट सकाळी 10 ते 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वसाधरण गुणवत्ता यादी ( मेरीट लीस्ट) जाहीर होणार.
  • प्रवेश अर्जात काही बदल करायचे असल्यास संधी दिली जाणार आहे.
  • 27 ऑगस्ट सकळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार
  • पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कट ऑफ संकेतस्थळवर जाहीर होणार.
  • 27 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश मिळालेले कॉलेज निश्चित करायचे आहे.
  • 30 ऑगस्ट रात्री 10 वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील.

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ. 11वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते.

ICSE निकाल

फोटो स्रोत, Getty Images

न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा दिनांक 14 ऑगस्ट 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असं शिक्षण विभागाने म्हटलं आहे.

प्रवेशाकरिता https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन मोबाईल अॅप डाऊनलोड करता येऊ शकेल. तसंच अधिक माहितीसाठी doecentralize11state@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)