इस्रायल-पॅलेस्टाईन वाद : हमासचे नेते म्हणतात, 'आता पुन्हा संघर्ष झाल्यास मध्य-पूर्वेचा नकाशा बदलेल'

याह्या सिनावर

फोटो स्रोत, ANADOLU AGENCY

फोटो कॅप्शन, याह्या सिनावर
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

गाझामधील हमासचे नेते याह्या सिनवार यांनी दावा केलाय की, "बोगद्यांच्या जाळ्याला उद्ध्वस्त करणं हा गेल्या महिन्यातील लढाईत इस्रायलचा प्रमुख उद्देश होता. मात्र, त्यात इस्रायलला अपयश आलंय."

इस्रायलमध्ये बोगद्यांच्या या जाळ्याला 'मेट्रो' म्हटलं जातं.

हमासचे नेते याह्या सिनवार यांनी शनिवारी (5 जून) केलेल्या भाषणात म्हटलं की, इस्रायल बोगद्यांचं तीन टक्के जाळंसुद्धा उद्ध्वस्त करू शकलं नाही.

हमासच्या प्रसारमाध्यमाच्या वेबसाईटवर 5 जून 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, "गाझामध्ये अॅकेडमिक आणि सार्वजनिक आयुष्यात वावरणाऱ्या लोकांशी बोलताना याह्या सिनवार यांनी म्हटलं की, इस्रायलसोबत 11 दिवस चाललेली लढाई म्हणजे हमाससाठी आपली सैन्य क्षमता तपासण्याची संधी होती."

इस्रायलसोबत संबंध सुधारण्यासाठी अरब देशांकडून उचललेल्या पावलांमुळेच त्यांचा गाझावर हल्ला करण्याची हिंमत झाली, असंही सिनवार म्हणाले.

'मध्य-पूर्वेचा नकाशा बदलेल'

सिनवार पुढे म्हणाले की, "पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशनला पुन्हा संघटित करण्याचा हक्क हमासने मिळवलाय. आता यात हमास आणि इस्लामिक जिहादसह सर्व पॅलेस्टिनी गटांना प्रतिनिधित्त्व करण्याचा हक्का मिळेल."

जर इस्रायलने पुन्हा संघर्ष सुरू केला, तर मध्य-पूर्वेचा नकाशाच बदलेल, असं याह्या सिनवार म्हणाले.

इस्रायल, पॅलेस्टाईन, गाझा

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, संघर्ष

"गाझामधील सक्रिय पॅलेस्टिनी गटांनी इस्रायलसोबत नुकत्याच झालेल्या संघर्षात केवळ आपली निम्मीच ताकद वापरली होती. जेरुसलेम आणि शेख जर्राह यांच्या वास्तावाला शत्रू बदलू शकत नाहीत. शिवाय, पॅलेस्टिनींमधल्या अंतर्गत मतभेदांचा फायदाही उठवू शकत नाहीत," असं सिनवार म्हणाले.

"आम्ही शत्रूंना दाखवून दिलंय की, अल-अक्सा मशिदीचं संरक्षण आम्ही करू शकतो आणि या रणनीतीत पॅलेस्टिनींना यश आलंय. वेस्ट बँक आणि इस्रायली अरबांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावरील दबाव वाढलाय," असंही सिनवार म्हणाले.

'लहान स्तरावरलं युद्ध कसं असतं, हे इस्रायलला दाखवलं'

सिनवार पुढे म्हणतात की, "50 टक्के विरोधकांची हत्या करण्याचा आणि गाझाला काही दशकं मागे नेण्याचा इस्रायलचा डाव होता. मात्र, त्यात त्यांना शून्य यश मिळालंय."

ते म्हणतात, "आम्ही आमच्या मिसाइल्सचं समुद्रात अनेकदा परीक्षण केलं आहे आणि त्याचा सराव करणं आवश्यक आहे. हा केवळ आमच्या क्षमतेचा सराव होता आणि इस्रायलला दाखवायचं होतं की, लहान स्तरावर युद्ध कसं असू शकतं."

इस्रायल, पॅलेस्टाईन, गाझा

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, सध्याच्या लढाईत गाझात शेकडो घरांची वाताहत झाली.

गाझाच्या पुनर्निर्माणाबाबात याह्या सिनवार यांनी सांगितलं की, "गाझाचं समर्थन करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आमचे दरवाजे खुले असतील. गाझाच्या पुनर्निमाणासाठीच्या पैशांचा वापर हमास विरोधासाठी करणार नाही. आम्ही कुठल्याही स्थितीत गाझाला कमकुवत होऊ देणार नाही."

इस्रायल आणि गाझा यांच्यात नुकतंच झालेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. हा संघर्ष जवळपास 11 दिवस चालला. यात गाझामधील 250 हून अधिक लोकांचा जीव गेला.

अल-अक्सा मशिदीच्या कंपाऊंडमधील हिंसा आणि शेख जर्राहमधून पॅलेस्टिनी कुटुंबांना बाहेर काढण्याच्या योजनेनंतर या संघर्षाला सुरुवात झाली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)