कोरोना लस: मुंबईत वॉक इन लसीकरण मोहीम

फोटो स्रोत, Getty Images
सोमवार 24 मे ते 26 मे असे सलग 3 दिवस लसीकरणासाठी थेट येण्याची, म्हणजेच 'वॉक इन' सुविधा उपलब्ध असणार आहे. तर 27 ते 29 मे या काळात पूर्व नोंदणी करून लस मिळणार आहे.
कोव्हिड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लशीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
वॉक इन लसीकरणासाठी कोण पात्र आहेत?
पहिल्या टप्प्यात, कोव्हिशिल्ड लस मिळालेले 60 वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिक तसंच 60 वर्ष 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील (फ्रंटलाईन) इतर कर्मचारी यांच्यातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी वॉक इन साठी पात्र असतील.
45 वर्ष व त्यावरील वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी असतील.
प्रक्रिया कशी राबवली जाणार?
27 मे 2021 ते 29 मे 2021 असे तीन दिवस प्रत्येक केंद्रावर 100% लसीकरण हे कोविन प्रणालीवर नोंदणी केल्यानंतर तसेच लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच (स्लॉट बुकींग) करण्यात येईल.
30 मे रोजी लसीकरण बंद राहणार
आठवड्यातील लसीकरणाच्या सदर नियोजनामध्ये अनपेक्षित कारणांनी काही बदल करावा लागल्यास त्याबाबतची पूर्वसूचना एक दिवस आधी प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं ह्यांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, केंद्र सरकारने अलीकडे केलेल्या सूचनेनुसार, कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रांमध्ये पूर्वीच्या 6 ते 8 आठवड्यांऐवजी आता किमान 12 ते 16 आठवड्याचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेनंतर 84 दिवसांचे अंतर राखून दुसरी मात्रा दिली जाईल.
ही बाब लक्षात घेता, 1 मार्च 2021 पासून कार्यान्वित झालेल्या लसीकरण टप्प्यातील 60 वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी तसेच आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांनी 1 मार्च 2021 रोजी कोविशील्ड लसीची पहिली मात्रा घेतली असल्यास, त्यांना 24 मे 2021 अथवा 84 दिवसांनंतर दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























