पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

देशभरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.

सातव्या टप्प्यात 34 जागांसाठी मतदान होणार असून 81 लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मतदानात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने केंद्रीय दलाच्या 796 तुकड्या राज्यात तैनात केल्या आहेत. मतदानावेळी करोनाच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. 2 मे रोजी निकाल जाहीर होतील. सातव्या टप्प्यात 36 ठिकाणी मतदान होणार होतं मात्र मुर्शिदाबाद इथे शमशेरगंज आणि जांगापूर मतदारसंघात संयुक्त मोर्चाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने इथल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मतदारसंघांमध्ये 16 मे रोजी मतदान होणार आहे.

भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असं या निवडणुकीला वळण मिळालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे विविध राज्यातील अनेक नेते या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून आहेत.

सोमवारी होत असलेल्या मतदानात, मुर्शिदाबादमधील नऊ जागा, पूर्व बर्दवान, दक्षिण दिनाजपूर, मालदा आणि कोलकाता इथल्या नागरिकांचा कौल मतपेटीत बंद होईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या टप्प्यात प्रत्यक्ष प्रचारात सहभाग नोंदवला नाही. त्यांनी व्हर्च्युअल माध्यमातून जनतेला संबोधित केलं होतं. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही वाढत्या कोरोना संख्येमुळे पश्चिम बंगालमधील सभा रद्द केल्या होत्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)