कोरोना : नवाब मलिक म्हणतात, 'महाराष्ट्राला औषधं न देण्याचं केंद्राचे कंपन्यांना आदेश'

फोटो स्रोत, NAWAB MALIK/FACEBOOK
महाराष्ट्राला औषधं देऊ नका, असं कंपन्यांना केंद्र सरकारनं आदेश दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी सोशल मीडियाद्वारे हे आरोप केले आहेत.
नवाब मलिक म्हणाले, "निर्यात करणाऱ्या 16 कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं रेमडेसिवीरबाबत विचारलं असता, त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. महाराष्ट्राला औषधं देऊ नयेत, असं केंद्र सरकारनं या कंपन्यांना आदेश दिलेत. या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं दिली, तर त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा त्यांना देण्यात आलाय."
"आजच्या स्थितीत या कंपन्यांकडून रेमडेसिवीरचा साठा जप्त करून गरजूंपर्यंत पोहोचवण्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडे पर्याय उरणार नाही," असंही नवाब मलिक म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter
नवाब मलिक यांच्या या गंभीर आरोपांनंतर महाराष्ट्र भाजपकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, "नवाब मलिक यांनी असे निराधार आरोप करण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर द्यावेत, अन्यथा माफी मागावी. महाविकास आघाडीनं आरोप करण्याचा खेळ थांबवून, साथ कशी रोखता येईल याकडे लक्ष देण्याची ही वेळ आहे."

- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

"नवाब मलिक यांनी केलेले आरोप म्हणजे महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे का? तसं असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे येऊन सत्य परिस्थिती स्पष्ट केली पाहिजे. किंवा या मंत्र्यांना बेजबाबदार आणि निराधार आरोप करण्यापासून रोखलं पाहिजे."

फोटो स्रोत, Twitter
दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांवर केंद्र सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास, महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगण्याची चिन्हं आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























