You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव यांना कोरोनाचा संसर्ग
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
या दोघांनीही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयात गेल्या आठवड्यात कोरोनाचा कहर झाल्याचं दिसून आलं होतं. त्यांच्या कार्यालयातील अनेक जणांना एकामागून एक कोरोनाची लागण होत असल्याचं आढळून येत होतं.
या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ हे मंगळवारी (13 एप्रिल) स्वतःहून विलगीकरणात गेले होते. त्यानंतर आज त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
ट्विटरवर योगी आदित्यनाथ यांनी याबाबत माहिती देताना लिहिलं, "प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर मी तातडीने कोव्हिड चाचणी करून घेतली आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेचं मी पूर्णतः पालन करत आहे. सध्या मी माझं काम व्हर्चुअल स्वरुपात करत आहे."
"उत्तर प्रदेश सरकारचं काम नेहमीप्रमाणे सुरू आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसंच त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी," असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
त्याआधी आजच (14 एप्रिल) सकाळी 10 च्या सुमारास खासदार अखिलेश यादव यांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवर दिली.
आताच माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. मी स्वतः विलगीकरणात गेलो असून माझ्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी नम्र विनंती करतो. सर्वांनी काही दिवस विलगीकरणात राहावं, असं अखिलेश यादव म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.