समीर गायकवाड : टिकटॉक स्टारची आत्महत्या

समीर गायकवाड

फोटो स्रोत, Sameer Gaikwad

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
लाईन

टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी (21 फेब्रुवारी) संध्याकाळी पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. समीरच्या आत्महत्येचं कारण मात्र स्पष्ट होऊ शकलं नाहीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 वर्षांच्या समीर गायकवाड याने वाघोलीतील त्याच्या घरी आत्महत्या केली. रविवारी (21 फेब्रुवारी) संध्याकाळी पाच वाजण्याच्या समुरास ही घटना घडली.

समीरचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची माहिती दिली.

पोलिसांनी त्याला तातडीने लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केलं. मात्र उपाचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

समीर गायकवाड

फोटो स्रोत, Sameer Gaikwad

समीरने आत्महत्या का केली याचं कारण समोर आले नाही. त्याने आत्महत्येपूर्वी कुठली चिठ्ठी लिहीलेली पोलिसांनी सापडली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

कोण होता समीर गायकवाड?

समीर हा पुण्यातील वाडिया महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. तो इन्स्टाग्रामवर म्युझिकल व्हीडिओ तयार करायचा. त्याचा मोठा चाहता वर्ग होता.

व्हीडिओ कॅप्शन, या व्हीडिओतून तुम्हाला हेल्पलाईनसाठी मदत मिळेल.

तो ब्लॉगर म्हणून सुद्धा ओळखला जात होता. त्याचे अनेक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहेत. त्याच्या मृत्यूचा जबर धक्का त्याच्या कुटुंबियांना बसला आहे. पोलीस या आत्महत्येमागे दुसरं कुठलं कारण आहे का, याचा शोध घेत आहेत.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)