चीनकडून बीबीसी वर्ल्ड टीव्हीच्या प्रक्षेपणावर बंदी

चीनने बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस टीव्हीच्या कार्यक्रमांचं प्रक्षेपण करण्यावर बंदी घातली आहे. चीनचं म्हणणं आहे की बीबीसी अयोग्य आणि खोटी पत्रकारिता करतंय.
बीबीसीने चीनमधली कोरोना व्हायरसची साथ आणि शिनजियांग प्रांतात वीगर मुसलमानांचं शोषण यावर गेल्या काही महिन्यात रिपोर्टिंग केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं की चीनमध्ये इंटरनेट आणि माध्यमांवरती सगळ्यात कडक निर्बंध लागू आहेत. यात असंही म्हटलंय की चीनचा हा निर्णय जगभरात चीनचीच नाचक्की करेल.
गेल्या आठवड्यात ब्रिटनचं माध्यम नियमक मंडळ ऑफकॉमने चीनच्या सरकारी नियंत्रणात येणारं चॅनल सीजीटीएनचं प्रक्षेपण बंद केलं होतं.
दुसरीकडे बीबीसीच्या आशिया विभाग संपादकांचं म्हणणं आहे की या निर्णयाने फारसा फरक पडणार नाही कारण चीनमध्ये बहुतांश लोकांना हे चॅनल आधीपासूनच उपलब्ध नव्हतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
बीबीसीकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "चीनच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला याबद्दल आम्हाला खेद आहे. बीबीसी जगभरातल्या सगळ्यात विश्वासू माध्यमांपैकी एक आहे आणि जगभरात पूर्ण निष्पक्षपणे तसंच कोणत्याही दबावाशिवाय काम करतं."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)