सीरम इन्स्टिट्यूट आग : कोरोना लस सुरक्षित, दुर्घटनेची चौकशी सुरू - उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter/@CMOMaharashtra
जगातील सर्वात मोठी लस उत्पादन संस्था असणाऱ्या पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटला लागलेल्या आगीत कोव्हिशिल्ड लशीचं काहीही नुकसान झालं नसलं तरी संस्थेचं एक हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती संस्थेचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (22 जानेवारी) या संस्थेला भेट दिली आणि ज्या ठिकाणी आग लागली होती तिथली पाहाणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगीची चौकशी सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ते म्हणाले, "या काळ्याकुट्ट वातावरणात आशेचा किरण अशा या लस बनवणाऱ्या केंद्रामध्ये अचानक आग लागल्याची बातमी आली आणि क्षणभर केवळ आपल्याच नाही तर सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. दुर्दैवाने त्यामध्ये पाच जण मृत्युमुखी पडले."

फोटो स्रोत, Twitter/@adarpoonawalla
"परंतु, जिथे ही लस बनवली जाते आणि लसीचं उत्पादन झाल्यानंतर जिथे ठेवली जाते तिथे कोणताही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडली नाही. तो संपूर्ण साठा आणि केंद्र सुरक्षित आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ही आग म्हणजे घातपात आहे का, अशीही शंका उपस्थित करण्यात आली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "आगीबद्दल चौकशी केली जात आहे. म्हणून मला असं वाटतं की अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य राहणार नाही."
जिथे कोरोनावरील लस बनवली जाते ते केंद्र आग लागल्याच्या ठिकाणाहून अंतरावर आहे. तिथे कुठलीही दुर्घटना घडलेली नाही. लस उत्पादन आणि तिचं भांडारण योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे लशीच्या पुरवठ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, अशी माहिती आदर पुनावाला यांनी दिली.
पुनावाला म्हणाले, "आगीचा कोव्हिशिल्ड लशीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही आणि सध्या लशीचा जो स्टॉक आहे त्याचंही नुकसान झालेलं नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
मात्र, या आगीमुळे संस्थेला मोठा आर्थिक फटका बसल्याचं संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आगीत संस्थेचं एक हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचंही पुनावाला म्हणाले.
या आगीमुळे कोरोनावरील लशीच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होणार नसला तरी बीसीजी आणि रोटा लशीच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असं सीरम इन्स्टिट्यूने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी भागातल्या नव्या प्लांटला काल दुपारी आग लागली होती. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि वेल्डिंग करताना स्पार्क झाल्याने आग लागल्याचं सांगण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 ते 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, आगीत 5 मजुरांचा मृत्यू झाला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)