सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग आटोक्यात, 5 जणांचा मृत्यू, कोरोना लशीला धोका नाही

आग
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पुण्याच्या सीरम इंस्टिट्युटमध्ये लागलेली आग अटोक्यात आली आहे. सध्या अग्निशामन दलाकडून इथं कुलींगचं काम सुरू आहे. या आगीत शेवटच्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांच्या मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.

संपूर्ण आग विझल्यानंतर आग लागलेल्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर पुन्हा एकदा आग लागली होती. पण ती तात्काळ आटोक्यात आणण्यात आली आहे.

वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली होती, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

"सीरमच्या आग लागलेल्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या मजल्यावर बांधकाम सुरू होतं. आग नेमकी कशी लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही. शेवटचा मजला पूर्णपणे जळून खाक झाला आहे. आग विझल्यानंतर जेव्हा शेवटच्या मजल्याची पाहणी करण्यात येत होती तेव्हा हे मृतदेह आढळून आले. मृत्युमुखी पडलेले हे इमारतीच्या बांधकामासाठी आलेले मजूर असावेत. इतर सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे," असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी सुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मृत्युमुखी पडलेल्यांची नावे

  • प्रतिक पाष्टे - नऱ्हे, पुणे
  • महेंद्र इंगळे - डेक्कन, पुणे
  • रमाशंकर हरिजन - उत्तर प्रदेश
  • बिपीन सरोज - उत्तर प्रदेश
  • सुशिल कुमार पांडे - बिहार

मृतांच्या नातेवाईकांना सीरमच्या व्यवस्थापनाकडून 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी केली पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आग लागलेल्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अजित पवार

फोटो स्रोत, DIO

उद्या या परिसराची संपूर्ण पाहणी केल्यावर चित्र स्पष्ट होईल. तसंच अमोनोराच्या फायरगाड्यांनी चांगलं काम केलं, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

पंतप्रधान मोदींनी ज्या इमारतीला भेट दिली. त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली होती. उद्या फायर ऑडिट करणारी टीम दाखल होणार आहे. कंपनीने योग्य खबरदारी घेतली होती का याचं ऑडिट केलं जाईल. तसंच या भागात पोलीस सुरक्षा कायम ठेवणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

या आगीचा कोव्हिशिल्ड लशीच्या उत्पदानावर कुठलाही परिणाम होणार नाही. या इमारतीमध्ये कोव्हिशील्ड लशीचं उत्पादन सुरू नव्हतं.

साधारण पावणे तीनच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशामन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सधारण 4 वाजून 10 मिनिटांनी ही आग अटोक्यात आली आहे.

सहा लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. इलेक्ट्रिक बिघाडामुळे ही आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार म्हणजेच 22 जानेवारी रोजी दुपारी आग लागलेल्या सीरमच्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील. साडेतीनच्या सुमारास हडपसर परिसरातील सिरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील आणि पाहणी करतील.

आगीवर नियंत्रण

सीरममधल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. कोव्हिडची लस बनवणाऱ्या विभागात ही आग लागली नव्हती. तिथं बीसीजी लशीचं काम सुरू होतं. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आग लागली होती, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

सीरममधल्या सुरक्षेवर आता लगेचच भाष्य करणं योग्य होणार नाही. आधी आगीपासून सर्व वाचवणं महत्त्वाचं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

"घातपाताची माहिती विरोधकांकडे नेमकी कशी येते? हे गुपीत आहे. सर्जिकल स्ट्राईक किंवा इतर गोष्टींची त्यांना आधीच माहिती कशी मिळते? त्यांचं ज्ञान अगाध आहे. त्यांना काहीतरी विद्या वगैरे प्राप्त आहे. त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी ती जरूर द्यावी. पण त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे," असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.

पुण्याच्या मांजरी भागातील सीरमच्या नव्या संकुतलातल्या इमारतीला ही आग लागली होती. या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग लागली आहे. एसईझेड-3 नावाची ही इमारत आहे. ही इमारत सध्या निर्माणाधीन असल्याचं सीरमच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

व

सीरम इंस्टिट्युटचे मालक आदर पुनावाला यांनी ट्वीट करून आगीविषयी माहिती दिली आहे.

"या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही, तसंच सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. आगीमुळे काही मजल्याचं मात्र नुकसान नक्की झालं आहे," असं आदर पुनावाला यांनी ट्वीट केलं आहे.

लोकांनी केलेल्या प्रार्थनांबाबत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

या इमारतीमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याचं पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महापालिका आयुक्तांशी फोनवरून आगीची माहिती घेतली आहे. परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिला आहेत.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली आणि तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.

इथं कोव्हिशिल्डचं उत्पादन नाही

"पावणे तीन वाजता आग लागली, सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. इथं कोव्हिशिल्डचं कुठलंही काम सुरू नव्हतं," असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.

व

"आगीबाबत आदर पुनावाला यांच्याशी बोलणं झालं आहे. तसंच पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशीसुद्धा मी चर्चा केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पुनावाला यांनी सांगितलं आहे," असं स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

"सीरम इन्स्टिट्युटला आग लागली आहे. आगीच कारण स्पष्ट झालेली नाही. समाधानकारक माहिती म्हणजे जिथे कोव्हिडची लस तयार होते तिथे आगाचा प्रादुर्भाव नाही," असं अन्न आणि औषध विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं आहे.

एसईझेड-3 नावाची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये लस तयार होण्याचं काम होत नव्हतं. लस तयार होणारी इमारत वेगळी आहे, अशी माहिती स्थानिक आमदार चेतन तुपे यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)