You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 एप्रिल आणि 1 मेनंतर घेण्याचा विचार - वर्षा गायकवाड
राज्यात 10 वी बोर्डाची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि 12 ची परीक्षा 1 मे नंतर घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोना संसर्गामुळे शैक्षणिक वर्ष कोलमडून गेलं आहे. हे शैक्षणिक वर्ष पुन्हा मार्गावर आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंख यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यात.
त्यामुळे राज्यात 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा कधी होतील. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा कशा घेण्यात येतील याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.
10वी आणि 12वी च्या परीक्षेबाबत माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, "10 वी बोर्डाची परीक्षा 15 एप्रिलनंतर आणि 12 ची परीक्षा 1 मे नंतर घेण्याच्या विचारात आहोत. आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाचवी ते आठवी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल."
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शाळा सुरू झाल्या असून. मुंबई आणि ठाणे वगळता शहरी भागातील शाळा हळूहळू सुरू होताना दिसून येत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)