रणबीर कपूर आलिया भटः कोरोनाची साथ आली नसती तर...

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

बॉलीवूडच्या या दोन स्टार्सच्या अफेअरची चर्चा नेहमीच रंगते. फॅन्ससाठी हा एक चटपटीत चर्चेचा विषय असतो. चित्रपट समीक्षक असो किंवा बॉलीवूडच्या बातम्या मिळवणारे पत्रकार. रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी माहिती मिळवण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो.

'कोरोना साथीच संकट नसतं. तर आतापर्यंत लग्न झालं असतं,' असा खुलासा खुद्द रणबीर कपूरने नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे.

बॉलीवूड चित्रपटांची समिक्षा करणारे राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत. रणबीरने आलियासोबत लग्नाचा खुलासा केला.

रणबीरने केलेल्या खुलाशानंतर, आलिया-रणबीर सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होत आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्ताप्रमाणे, राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरने आलिया माझी गर्लफ्रेंड असल्याचं मान्य केलं.

मग लग्नाचा विचार केला का?

या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला, 'कोरोना साथ आली नसती तर आतापर्यंत लग्न झालं असतं. पण, आता मी या विषयावर काही बोलू इच्छित नाही. ही गोष्ट मला लवकरात लवकर करायची आहे.'

काही महिन्यांपूर्वी राजीव मसंद यांनी रणबीर-आलिया 4 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं आर्टिकल लिहिलं होतं. पण, या स्टार कपलने कधीच याबद्दल खुलासा केला नाही.

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आलियासोबत वेळ कसा घालवला. या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला, 'आलियाने सर्वच बाबतीत यश संपादन केलं आहे. तिने घरच्या अनेक गोष्टी शिकल्या आहेत.'

आलियाची स्तुती करताना रणबीर म्हणतो, 'तुम्हाला माहित आहे. माझी गर्लफ्रेंड आलियाने मोठं यश संपादन केलंय. गिटार वाचवण्यापासून ते पटकथा लिहीण्यापर्यंत. आलिया सर्व शिकली आहे.'

'तिच्याकडे पाहाताना काहीवेळा वाटतं, मी काहीच यश संपादन करू शकलेलो नाही,' असं रणबीर मुलाखतीत पुढे म्हणतो.

राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत रणबीर आपल्या कुटुंबाबद्दलही मोकळा झालाय. वडील ऋशी कपूर यांच्या निधनानंतर त्याने स्वत:कडे कसं लक्ष दिलं. खासगी आणि व्यावसायिक जीवन कसं सांभाळलं याबद्दलही रणबीरने माहिती दिली आहे.

ऋशी कपूर यांची तब्येत बरी नसताना आलियात सतत रणबीर कपूरसोबत असल्याचं पाहायला मिळालं होतं.

आलिया आणि रणबीरने 2018 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. गेल्या वर्षभरात दोघांनी अनेकदा कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावल्याचं पहायला मिळालं.

बांद्राच्या पाली हिल परिसरात ज्या इमारतीत रणबीर रहातो. त्याच इमारतीत आलियाने घर घेतल्याचं बोललं जातंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)