'कॉक्रोच जनता पार्टी एक चळवळ, राजकीय पक्ष होईल, असं वाटत नाही' - विश्वंभर चौधरी

'कॉक्रोच जनता पार्टी एक चळवळ, राजकीय पक्ष होईल, असं वाटत नाही' - विश्वंभर चौधरी
Published

पुण्यात होत असलेल्या अभिजीत दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, विजय कुंभार आणि वकील असीम सरोदे यांनी पाठिंबा दिला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी बोलताना विश्वंभर चौधरी म्हणाले की, 'चळवळीतून येणारे पक्ष वाईट ही मानसिकता काही बरोबर नाही.' तसेच, तरुणांनी राजकारणात येऊन देशाचा गाडा हाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

वकील असीम सरोदे यांनी 'न्यायालयात जाण्याचा पर्याय हा आपण शेवटचा पर्याय म्हणून वापरला पाहिजे' असे सांगत रस्त्यावरील लढाईचे महत्त्व अधोरेखित केले.

तर विजय कुंभार यांनी नोकरभरती आणि पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून तरुणांमधील नैराश्याकडे लक्ष वेधले.

या मुलाखतीत आंदोलनाची पुढील दिशा आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

शूट - नितीन नगरकर

एडिट - गुलशनकुमार वनकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)