2020 या वर्षात जगाने कोणते चढ-उतार अनुभवले?

2020 चे फोटो

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करताना सरत्या वर्षानं आपल्याला काय दिलं हा लेखाजोखा मांडायचा म्हटलं तर कोरोना, लॉकडाऊन, न्यू नॉर्मल हेच शब्द आठवतात.

2020 वर्षाची सुरुवात झाली तेव्हा जग एका नवीन दशकाचं स्वागत करत होतं. नवीन आशा, आकांक्षा उराशी बाळगून नवी स्वप्न पाहत होतं. पण 2020 मध्ये अनेक गोष्टी अनपेक्षित घडल्या. संपूर्ण जगासमोर कोरोनासारखं जीवघेणं आरोग्य संकट उभं राहिलं. त्यामुळे हे वर्ष नकारात्मकताच घेऊन आलं अशीच आपली भावना झाली.

पण 2020 हे वर्ष काही बाबतीत आनंद, उत्साह, चांगुलपणाचा अनुभव देणारंही ठरलं. तसंच कोरोनाशिवायही काही संकटांना आपल्याला सामोरं जावं लागलं.

जगभरातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा यावर्षीच्या प्रत्येक महिन्यात घेण्यात आलेल्या या छायाचित्रातून घेतलाय. 2021चं स्वागत करताना 2020 कडे वळून पाहणारी ही छायाचित्रं...

जानेवारी

चीनमध्ये एका जीवघेण्या विषाणूची दहशत पसरली होती. त्यावेळी याबाबत खूप कमी माहिती होती. त्यावेळी सुरक्षेसाठी योग्य साधनांच्या अभावामुळे काही लोकांनी दैनंदिन वापरातील गोष्टींचा सुरक्षेसाठी पर्यायी वापर केला.

चीनी मुलं

फोटो स्रोत, Getty Images

फेब्रुवारी

सुपरमूनचा आनंद जगभरातील लोकांनी घेतला. ही या वर्षातली एक प्रमुख खगोलीय घटना होती. हा फोटो तुर्कस्तानातील एदिर्ने शहरातला आहे. याठिकाणी 16 व्या शतकातील सेलिमीये मशिदीची मिनार आणि सुपरमून एकाच वेळी दिसत होते.

सुपरमून

फोटो स्रोत, Getty Images

मार्च

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडॉऊन जाहीर करण्यात आले. या काळात खरेदी, भेटीगाठी, शिक्षण, नोकरी सगळंच ऑनलाईन करावं लागलं. याचकाळात हाँगकाँगमधील शिक्षक ऑनलाईन क्लाससाठी रेकॉर्डिंग करत होते.

ऑनलाइन क्लास

फोटो स्रोत, Getty Images

एप्रिल

सोशल डिस्टन्सिंगमुळे लोकांनी शिस्त पाळली. अमेरिकेत एक कॅथलिक धर्मगुरूंनी अंतर राखत पवित्र जल शिंपडण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब केला.

कॅथलिक पादरी

फोटो स्रोत, Jim West/ZUMA Wire/Shutterstock

मे

अफ्रिकन-अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा अमेरिकन पोलीस कस्टडीत मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं.

याविरोधात जगभरात विविध ठिकाणी रंगभेद आणि पोलिसांच्या गैरवर्तणूकीविरोधात आंदोलन केलं गेलं. कॅलिफोर्नियातील सॅकरामेंटोमध्ये झालेल्या आंदोलनाचा हा फोटो आहे.

वंशवाद विरोधी आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

जून

लॉकडॉऊनच्या सुरुवातीच्या काळात बार्सिलोनाच्या ग्रॅन टीट्रे डेल लिसू काँसर्ट हॉलमध्ये दोन हजाराहून अधिक नर्सरी झाडांच्या समोर सादरीकरण करण्यात आलं. त्यावेळच्या आव्हानात्मक परिस्थितीतही कलेचं महत्त्व दर्शवण्याचा झालेला हा प्रयत्न.

बार्सिलोना, ग्रॅन टीट्रे डेल लिसु

फोटो स्रोत, Reuters

जुलै

या महिन्यात टोळधाडीमुळे काही ठिकाणी मोठं नुकसान झालं. केनियातील एका स्त्रीला असहाय्यपणे तिच्या जमिनीवर पीक उद्ध्वस्त होताना पाहणं भाग पडलं. इराण, भारत आणि पाकिस्तानमध्येही टोळधाडीनं मोठं नुकसान केलं.

केनया महिला

फोटो स्रोत, Reuters

ऑगस्ट

लेबनानच्या बैरूतमध्ये झालेल्या महाशक्तीशाली स्फोटात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक जखमी झाले. पियोनोवादक रेमंड इसायान या हल्ल्यात बेघर झाले.

संगीतकार रेमंड इसायान

फोटो स्रोत, Getty Images

सप्टेंबर

ब्राझीलच्या अॅमेझॉन जंगलात या शतकातील सर्वांत मोठी आग लागली. या आगीने पर्यावरणप्रेमींची चिंता वाढवली. या आगीत जखमी झालेला चित्ता वाचला खरा पण त्याचे पंजे जळाले.

जग्वार

फोटो स्रोत, Reuters

ऑक्टोबर

लॉकडॉऊनमध्ये निर्बंध शिथील करावे की कडक याबाबत जगभरातील सत्ताधारी गोंधळात दिसले. कारण कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी-अधिक होत होती.

व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी कोरोनामुळे भविष्य अंधारमय झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. इटलीची राजधानी रोमममधील एका रेस्टॉरंटने या कवटीचा उपयोग आपला व्यवसाय बंद पडतोय हे दर्शवण्यासाठी केला.

रेस्टॉरंटच्या टेबलावर बसलेला मानवी सांगाडा

फोटो स्रोत, Getty Images

नोव्हेंबर

थायलंडचे मित्री चिटिनुंडा राजघराण्याचे कट्टर समर्थक होते. पण यावर्षी लोकशाही आणि सुधारणांच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनांनी त्यांना आपले विचार बदलण्यासाठी प्रवृत्त केले.

आता त्यांनी आपल्या केसांचे डिझाईन तीन बोटांच्या चिन्हांवर आधारित केले आहे. याचा संबंध भुकेशी असून संपूर्ण थायलंडमध्ये हे चिन्ह विरोध करण्याचे प्रतीक मानले जाते.

मित्री चिटिनुंडा

फोटो स्रोत, Reuters

डिसेंबर

कोरोना व्हायरसमुळे जमीनीवर हाहाकार माजला असला तरी अंतराळात मात्र स्पर्धा सुरू आहे. चीनचे अवकाशयान चंद्रावर पोहचण्यात यशस्वी झाले.

चंद्रावर आपला ध्वज रोवणारा चीन हा दुसरा देश ठरला. चांग ई-5 मिशनअंतर्गत 44 वर्षात पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागावरून माती आणि खडकांचे नमुने आणण्यात यश मिळाले.

चीनचा ध्वज

फोटो स्रोत, EPA

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)