You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण
भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले नेते एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिनी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
"मला कोरोना झालाय पण माझी प्रकृती उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. जे कार्यकर्ते माझ्या संपर्कात आले होते त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि आपल्या आरोग्याला जपावे," असं खडसेंनी म्हटलं आहे.
मला इतर कुठलीही लक्षणं नाहीत असं देखील त्यांनी सांगितलं.
एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोरोनामुक्त होईपर्यंत मला कुणीही भेटण्यास येऊ नये असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
काही दिवसांपूर्वीच खडसेंची मुलगी रोहिनी खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे आता खडसे कुटुंबाला विलगीकरणात राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
ज्येष्ठ नेते चार दशकांनी पक्षांतर करत असल्याने गेले काही आठवडे एकनाथ खडसे चर्चेत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी प्रचंड टीका केली होती. फडणवीसांमुळेच आपण पक्ष सोडत आहोत असंही खडसे म्हणाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 20 आणि 21 तारखेला उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार होते. त्यामुळे आता पवारांचा दौरा रद्द होण्याचीही शक्यता आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)