एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

एस. पी. बालसुब्रमण्यम

फोटो स्रोत, Instagram/ispbofficial

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम (74) यांचे आज निधन झाले आहे. चेन्नईमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

एसपीबी यांनी 40 हजारहून अधिक गाणी गायली होती. त्यांनी अभिनय, संगीत दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली होती. गेल्या चाळीस वर्षांमध्ये केवळ तमिळच नाही तर संपूर्ण भारतातील श्रोत्यांना त्यांच्या मधुर आवाजाने मुग्ध केलं होतं. तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, संस्कृत, हिंदी अशा अनेक भाषांमधून त्यांनी गीतांना आवाज दिला होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

बालसुब्रमण्यम 5 ऑगस्टपासून चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्यावर कोव्हिड 19साठीचे उपचार करण्यात येत होते.

आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सुब्रमण्यम यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली होती.

पण गेल्या 24 तासांत त्यांच्या प्रकृती अधिक खालावली असून त्यांना जास्तीत जास्त लाईफ सपोर्ट देण्यात येत असल्याचं हॉस्पिटलने म्हटलं होतं..

काही दिवसांपूर्वी बालसुब्रमण्यम यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती, पण तरीही त्यांना व्हेंटिलेटरवरचा आधार द्यावा लागला होता.

एसपीबी यांचा जन्म 4 जून 1946 रोजी तिरुवल्लूर जिल्ह्यातील कोंडडमपट्टू गावात जन्म झाला होता. 1966 साली श्री श्री मरियता रमणा या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा एका गाण्याला आवाज दिला. त्यानंतर त्यांचा सिनेसंगीतातला प्रवास वेगानं सुरू झाला.

एसपीबी या नावाने ओळखले जाणारे बालसुब्रमण्यम यांची हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषांतली अनेक गाणी लोकप्रिय आहेत. तामिळबरोबरच हिंदी चित्रपटांमधील त्यांची असंख्य गाणी गाजली. त्यातगी मैने प्यार किया आणि हम आपके है कौन या चित्रपटांमधील त्यांच्या आवाजातली गाणी सर्वत्र ऐकली जाऊ लागली. प्रेक्षकांचं, श्रोत्यांचं त्यांना विशेष प्रेम मिळालं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)