नरेंद्र मोदींच्या 'मन की बात'ला डिस्लाईक करणारे आहेत तरी कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मन की बात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा कार्यक्रम पीआयबी, भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या युट्यूब चॅनेलवर पाहता आणि ऐकता येऊ शकतो. रविवारी प्रसारित झालेल्या कार्यक्रमावर जोरदार टीका होताना दिसते आहे.

या तिन्ही ठिकाणी लाईक्सच्या तुलनेत डिस्लाईकची संख्या जास्त आहे. आतापर्यंत मन की बात बाबत प्रेक्षकांचा पवित्रा नकारात्मक नसे. मग आता प्रेक्षक नाराज असण्याचं किंवा टीका करण्याचं कारण काय असा प्रश्न विचारला जात आहे.

रविवारी मन की बात प्रसारित होऊ लागल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया हळूहळू येऊ लागल्या. त्यांचा वेग कमी होता. कार्यक्रम सकाळी झाला परंतु रात्री उशिरापर्यंत प्रतिक्रियांचा नूर पालटला नाही.

कोरोना
लाईन

डिस्लाईक्स कोणी केले हे समजणं कठीण असलं तरी जेईई-नीट परीक्षा होणार असल्यामुळे नाराज विद्यार्थी आपली नाराजी व्यक्त करत असल्याचं लक्षात येतं आहे.

जेईई-नीट परीक्षा घेण्यात याव्यात असा निर्णय न्यायालयाने दिला. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी असंख्य विद्यार्थ्यांची मागणी आहे. परीक्षा होण्याच्या निर्णयावर नाराज विद्यार्थ्यांनी 'मन की बात'वर टीका केली आहे. नाराज विद्यार्थ्यांनी 'मन की बात' व्हीडिओवर टीका करावी असं आवाहनही केलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मन की बात

फोटो स्रोत, BJP/YOUTUBE

फोटो कॅप्शन, भाजप युट्यूब पेज

रात्री दीड वाजता भाजपच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर कालच्या मन की बातला पाच लाख व्ह्यूज होते. या व्हीडिओला 19 हजार लोकांनी लाईक केलं होतं. मात्र त्याचवेळी 1 लाख 81 हजार लोकांनी डिस्लाईक केलं होतं. लाईक्स आणि डिस्लाईक यांच्यातलं अंतर प्रचंड होतं.

पंतप्रधान मोदी यांच्या युट्यूब चॅनेलवरही मन की बात अपलोड करण्यात आलं. त्याल 4 लाख 90 हजार व्ह्यूज होते. या व्हीडिओला 19 हजार लाईक आणि 35 हजार डिस्लाईक्स होते. पीआयबीच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हीडिओ अपलोड झाल्यानंतर त्याला 91 हजार व्ह्यूज होते. 3.2 हजार लाईक्स तर 10 हजार डिस्लाईक्स होते.

पंतप्रधान मोदींनी मन की बात मध्ये विविध विषयांना हात घातला. ओणम सणाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय उद्योजकांना विविध पर्याय हाताळण्याची सूचना केली. स्वदेशीच्या मुद्यावर त्यांनी भर दिला. जागतिक टॉय इंडस्ट्री 7 लाख कोटी रुपयांची आहे, यामध्ये भारताचा वाटा मोठा आहे असं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मन की बात

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, मन की बात वरील प्रतिक्रिया

डेव्हलपर्स मंडळींनी भारतात कंप्युटर गेम्स बनवायला हवेत असं आवाहनही त्यांनी केलं. आपल्या देशात अनेक संकल्पना आहेत. व्हर्च्युअल गेम्स आणि गेम्स बनवण्यात आपल्याला महत्त्वपूर्ण भूमिका निभावायची आहे. लोकल खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आली आहे असंही ते म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)