You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित शाह यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
प्रकृती स्थिर असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एम्स हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं आहे. 18 ऑगस्टला त्यांना इथे दाखल करण्यात आलं होतं.
भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) मध्ये भरती करण्यात आलं होतं. अमित शाह यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र त्यांना गेल्या तीन ते चार दिवसांपासून थकवा आणि अंगदुखीचा त्रास होतोय.
नवी दिल्लीतील AIIMS च्या मीडिया अँड प्रोटोकॉल विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. आरती विज यांनी ही माहिती दिली.
अमित शाह यांची प्रकृती बरी आहे आणि ते हॉस्पिटलमधून आपलं काम सुरू ठेवतील, अशीही माहिती डॉ. आरती विज यांनी दिली.
अमित शाह यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
14 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अमित शाह यांनी स्वतः ट्वीट करून त्याची माहिती दिली आहे.
पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पुढचे काही दिवस विलगीकरणात राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
"कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसल्यानंतर मी कोरोना चाचणी केली. माझ्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती स्थिर आहे परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या माणसांनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी आहे", असं त्यावेळी अमित शाह यांनी ट्वीट करून सांगितलं होतं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
कोरोनाचा संसर्ग झाल्याने अमित शाह अयोध्येत झालेल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते.
गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये अमित शाह यांच्यावर उपचार सुरू होते.
अमित शाह यांना मधुमेहाचा आजार आहे. मधुमेहाच्या आजारामुळे अमित शाहांना डॉक्टरांनी वजन कमी करण्याचाही सल्ला दिला होता. त्याप्रमाणे आपल्या जीवनशैलीत बदल करत त्यांनी वीस किलो वजनही कमी केलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)