You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन: पंजाबमध्ये बनावट दारुमुळे 86 जणांचा मृत्यू
पंजाबमध्ये बनावट दारु प्यायल्यानं 62 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली.
अमृतसर, गुरुदासपूर आणि तरन तारण या तीन जिल्ह्यांमध्ये बनावट दारुमुळे मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. हे तिन्ही जिल्हे पाकिस्तानच्या सीमेलगत आहेत.
या घटनेतील एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.
तपासासाठी पोलीस आणि कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक स्थापन केलं आहे.
जालंधरच्या विभागीय आयुक्तांसह कर आकारणी आयुक्त आणि पोलीस अधीक्षक या तपासपथकात सहभागी आहेत. ही घटना घडण्यामागचं सत्य शोधण्याचं काम हे पथक करेल.
बिस नदीजवळ अवैध दारुचा व्यवसाय सुरु असल्याचं आम्ही पोलिसांना कळवलं होतं, असा दावा स्थानिक दारुविक्रेत्यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी त्याविरोधात कुठलीच कारवाई केली नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
या घटनेप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्यांमध्ये बलविंदर कौर नावाच्या महिलेचाही समावेश आहे. या महिलेविरोधात IPC च्या 304 कलमाअंतर्गत आणि उत्पादन शुल्काच्या 61/1/14 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरोमणी अकाली दलाचा काँग्रेसवर आरोप
दरम्यान, शिरोमणी अकलाी दलाने काँग्रेस आमदार सुखविंदर सिंग डॅनी आणि फॉरेस्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष साध सिंग सिंधू यांच्याविरोधात अवैध दारुविक्रीला संरक्षण दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
काँग्रेस आमदारांच्या दबावामुळे अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई केली नसल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणीही शिरोमणी अकाली दलाने केलीय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)