International Nurse Day: मुंबई पोलिसांच्या ट्वीटने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भारतासह जगभरात आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातोय.

अवघं जग कोरोना व्हायरसशी लढतोय. कोरोनाविरोधात वैद्यकीय क्षेत्रातला प्रत्येकजण रात्रंदिन मेहनत करतोय. त्यामुळं आजच्या दिवसाला त्या दृष्टीनंही महत्त्वं आलंय.

'लेडी विथ द लॅम्प' म्हणून जग ज्यांना ओळखतं, त्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन म्हणून 'आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन' साजरा केला जातो. त्या परिचारिका, संख्याशास्त्रज्ञ होत्याच, मात्र आपल्या अंगभूत सेवाभावी गुणामुळं त्या जगभर परिचित आहेत.

सोशल मीडियावर मंगळवारी सकाळपासूनच #InternationalNursesDay आणि #NursesDay2020 हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर लोक अधिकाधिक व्यक्त होतायेत आणि परिचारिकांबद्दल आदर व्यक्त करताना दिसतायेत.

'तुम बहोत मस्त काम करता है, सिस्टर, थँक यू'

प्रत्येकजण हटके शैलीत परिचारिकांना सलाम करताना दिसतोय. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या ट्वीटची मात्र अधिकच चर्चा होतेय.

मुंबई पोलिसांनी मुन्ना भाई एमबीबीएस सिनेमातील डायलॉगचा आधार घेत परिचारिकांना सलाम केलाय. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय, 'तुम बहोत मस्त काम करता है, सिस्टर! थँक यू'

केवळ परिचारिकांबद्दलच नव्हे, तर पुरुष नर्स म्हणजेच ब्रदर्सबद्दलही मुंबई पोलिसांनी आदर व्यक्त केलाय. 'नर्स मामू लोग को भी अपना थँक यू,' असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय.

मुंबई पोलिसांनी ज्याच्या सिनेमातील डायलॉगचा आधार घेतलाय, त्या संजय दत्तनेही ट्विटरवरून वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाचे आभार मानलेत.

दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या सगळ्यांचे आभार मानावे तितके थोडेच, असं संजय दत्तनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

सचिन तेंडुलकर, राहुल गांधी, शशी थरूर अशा सगळ्यांनीच सोशल मीडियावरून परिचारिकांना सलाम केलाय.

परिचारिका या कोरोनाविरोधातील लढ्यातील पहिल्या फळीतल्या योद्ध्या असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी जगभरातील परिचारिकांना सलाम केलाय आणि परिचारिकांसोबतचा फोटोही ट्वीट केलाय.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं परिचारिकांचे आभार मानलेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)