You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : औरंगाबादमधील महिलेचा उपचारानंतरचा रिपोर्ट निगेटिव्ह#5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. औरंगाबादच्या महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
औरंगाबादेत एक महिलेला कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. वैद्यकीय उपचाराचानंतर या महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
शनिवारी (21 मार्च) या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचं जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं.
परदेश दौरा करून परतलेल्या महिलेला करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
शनिवारी याबाबतचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महिलेच्या संपर्कात असलेल्या 21 जणांचे स्वॅब अहवालही निगेटिव्ह आल्याचे त्यांनी नमूद केले.
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
ही महिला 5 मार्चला रशियावरून औरंगाबादमध्ये आली होती. तेव्हा या महिलेला कुठलीच लक्षणं आढळली नाहीत. त्यामुळे या महिलेनं आपल्या नियमित कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे धडे घेतले, मैत्रिणींच्या भेटी घेतल्या, काही छोट्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
12 तारखेला अचानक ताप खोकला श्वास घेण्यास अडथळा वाटू लागले. त्यामुळे महिलेला रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांना ही सगळी लक्षणं कोरोना सदृष दिसली आली होती.
2. महाराष्ट्रात परराज्यातील बसेसना बंदी
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील संसर्ग रोखण्यासाठी एसटी महामंडळानं इतर राज्यातील बसेसना बंदी घातली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बसेसही इतर राज्यांमध्ये जाऊ शकणार नाहीत. वाहतूक विभागाने हे आदेश प्रसिद्ध केले आहेत.
रविवारी (22 मार्च) जनता कर्फ्यूच्या निमित्ताने राज्यातील एसटी बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मुंबई मेट्रोही रविवारी पूर्णवेळ बंद राहणार आहे
3. '130 कोटींच्या देशात फक्त 15071 लोकांची तपासणी?'
"भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे. कोरोनाचं गहिरं संकट देशावर आहे. तरीही देशात फक्त 15071 लोकांची तपासणी झाली आहे. इतरांची का नाही?" असा प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे.
इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली आहे.
"जे पॉझिटिव्ह आहेत किंवा जे संशयित आहेत त्यांच्यापर्यंत तपासणीच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त विभागवार तपासण्या झाल्या पाहिजेत," अशी मागणीही सोनिया गांधी यांनी केली आहे.
दरम्यान, देशात 84 हजार व्यक्तींमागे एक आयसोलेशन बेड, तर 36 हजार व्यक्तींमागे एक क्वारंटाईन बेड उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला मिळाली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं गोळा केलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. देशात 11 हजार 600 व्यक्तींसाठी 1 डॉक्टर, तर 1,826 व्यक्तींसाठी एक हॉस्पिटल बेड उपलब्ध असल्याचंही यात समोर आलं आहे.
4. पीएमसी बँक : निर्बंधांत आणखी 3 महिन्यांची वाढ
पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अर्थात पीएमसी बँकेवरील निर्बंध आणखी 3 महिन्यांनी म्हणजे 22 जून 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझव्र्ह बँकेने घेतला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
रिझव्र्ह बँकेनं 'कलम 35 -A' अंतर्गत 23 सप्टेंबर 2019ला पीएमसी बँकेवर 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लागू केले होते.
या निर्बंधांची मुदत संपुष्टात येण्याआधीच हे निर्बंध आणखी 3 महिन्यांनी वाढवण्यात आले आहेत.
त्यामुळे आता पीएमसी बँकेच्या खातेदारांना पुढील 3 महिने त्यांच्या खात्यातून 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता
5. World Happiness Index मध्ये भारत पाकिस्तान, बांगलादेशपेक्षाही मागे
संयुक्त राष्ट्र संघटनेनं 2020 या वर्षासाठीचा World Happiness Index प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारत 144 व्या क्रमांकावर असून गेल्या वर्षाची तुलना करता यंदा भारत 4 अंकांनी खाली घसरला आहे. द वायरनं ही बातमी दिली आहे.
या इंडेक्समध्ये नेपाळ 15, पाकिस्तान 29, बांगलादेश 107, तर श्रीलंका 130व्या क्रमांकावर आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाचा World Happiness Indexमध्ये जगभरातील 156 देशांचा समावेश असतो. यामध्ये संबंधित देशातील नागरिक किती आनंदी आहेत, यावरून देशाची क्रमवारी ठरवली जाते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)