कोरोना व्हायरस: डॉक्टरांचा सल्ला न ऐकल्यामुळे कलबुर्गीतील वृद्धाचा मृत्यू झाला का?

फोटो स्रोत, Getty Images
भारतात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. कर्नाटकमधील 76 वर्षांच्या वृद्धाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. ते काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाहून भारतात परतले होते.
सौदी अरेबियाहून परतल्यानंतर त्यांना न्यूमोनिया, खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 6 मार्चला कलबुर्गी इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या थुंकीचा नमुना बंगळुरूतल्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता.
कलबुर्गीमधल्या हॉस्पिटलने रुग्णाला हलवू नका, असा सल्ला दिल्यानंतरही त्यांना 9 मार्चला हैदराबादमधल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
मात्र, मंगळवारी (10 मार्च) त्यांना पुन्हा कलबुर्गीला आणण्यात आलं आणि तिथल्या गुलबर्गा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
या रुग्णाला इतरही गंभीर समस्या असल्याने त्यांचा मृत्यू Covid-19 नं झाल्याचं अधिकृतरीत्या सांगायला कर्नाटकमधील अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. अशा प्रकरणांमध्ये नेमका मृत्यू कशामुळे हे जाणून घेण्यासाठी नियमानुसार शवविच्छेदन केलं जातं. पण या प्रकरणात संबंधित वृद्धावर आधीच अंतिम संस्कार करण्यात आले होते.



भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मृतदेह पूर्णपणे निर्जंतुक करून कुटुंबीयांकडे सोपविल्याचं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामलू यांनी ट्वीट करून म्हटलं, की कलबुर्गीमधल्या एका 76 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना Covid-19 चा संसर्ग झाल्याचा अंदाज होता. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं. नियमानुसार त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ओळख पटवणं, त्यांना विलग करणं आणि इतर उपाय केले जात आहेत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ही व्यक्ती 29 जानेवारी ते 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत सौदी अरेबियामध्ये होती.
त्यांना दमा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. 29 फेब्रुवारीला ते हैदराबादला पोचले आणि तिथून कलबुर्गीला गेले असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
सौदी अरेबियाहून आल्यावर त्यांच्यात आजाराची कुठलीच लक्षणं दिसत नव्हती. मात्र, 6 मार्च 2020 ला त्यांना ताप आणि खोकला झाला. एका खाजगी डॉक्टरने त्यांच्या घरी जाऊन औषधोपचारही केले.
मात्र, 9 मार्चला त्यांची प्रकृती अधिक ढासळल्याने त्यांना कलबुर्गीमधल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलने त्यांना 'मिड झोन व्हायरल न्यूमोनिया' झाल्याचं निदान केलं. तसंच COVID-19 चा संसर्ग झाल्याचा संशयही व्यक्त केला.
मात्र, रिपोर्ट यायच्या आधीच रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलकडे डिस्चार्ज मागितला. मात्र डिस्चार्ज देणे योग्य नसल्याचं सांगूनही वैद्यकीय सल्ल्याविरोधात जाऊन नातेवाईक रुग्णाला घरी घेऊन गेले, असं केंद्र सरकारने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
कलबुर्गी जिल्हा उपायुक्तांच्या सूचनेनुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना भेटून रुग्णाला कलबुर्गी इथल्या गुलबर्गा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात (isolation ward) दाखल करण्यास सांगितलं.

फोटो स्रोत, EPA
मात्र, नातेवाईकांनी हा सल्लाही धुडकावला आणि ते रुग्णाला हैदराबादमधल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांना लगेच डिस्चार्ज देण्यात आला. 10 मार्चला हैदराबादमधल्या हॉस्पिटलमधून कलबुर्गीमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करायला आणत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना घरातच वेगळं ठेवण्यासारखे खबरदारीचे सर्व उपाय करत आहे आणि त्यांच्यावर देखरेखही ठेवत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























