You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA: जामिया विद्यापीठाबाहेर पुन्हा एकदा गोळीबार
दिल्लीच्या जामिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार जामियाच्या गेट नंबर पाच जवळ हा गोळीबार झाला.
जामियाचा विद्यार्थी जोएब अहमद याने बीबीसी हिंदीला सांगितलं की अचानक मुलांचा आरडा-ओरडा सुरू झाला नंतर कळलं की गेट नंबर पाच जवळ गोळीबार झाला आहे.
रात्री बाराच्या सुमारास किमान दोन राऊंड फायर झाल्याचं जोएबने सांगितलं.
रात्री उशिरा या घटनेचा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
हल्ल्याच्या एक दिवस आधीच विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरात कुठल्याही प्रकारचं आंदोलन न करण्याची सूचना केली आहे.
दोन अज्ञात व्यक्ती स्कुटीवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला अशी माहिती जामियाच्या समन्वय समितीचे अल अमीन कबीर यांनी बीबीसी हिंदीला दिली.
या गोळीबारात कुणीही जखमी झालं नाही.
30 जानेवारी रोजी एका अल्पवयीन मुलाने निदर्शनं करण्यांवर गोळीबार केला होता. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला होता. अल्पवयीन हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शाहीन बाग येथेही एका हल्लेखोराने गोळीबार केला. त्या ठिकाणी कुणी जखमी झालं नव्हतं. CAA विरोधी आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार होण्याची ही या आठवड्यातली तिसरी घटना आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)