रफाल वाद: नरेंद्र मोदींच्या भाजप आणि राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये 'चोर-चोर'ची आरडाओरड - बीबीसी मराठी राउंड अप

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

रफालचा वाद शमेना

"रफाल करारासाठी संरक्षण मंत्रालयाच्या कामात पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप करू नये. त्यामुळे भारताची बाजू कमकुवत होऊ शकते," असं निरीक्षण नोंदवणारी संरक्षण मंत्रालयाच्या फाईलमधील एक नोट 'द हिंदू' वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

'द हिंदू'च्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, "24 नोव्हेंबर 2015ची संरक्षण मंत्रालयातील एका अंतर्गत नोटनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण मंत्रालय आणि कराराशी संबंधित टीम यांची वेगवेगळी दखल घेतली होती."

यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत 'चौकीदार ही चोर है' या त्यांच्या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे. तर दिवसाअंती #RahulGandhiChorHai आणि #RahulKaBaapChorHai असे हॅशटॅग ट्रेंड झाले.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

मायावतींना पुतळ्यावरून सुप्रीम कोर्टाने सुनावले

नोएडा, ग्रेटर नोएडा आणि लखनौमध्ये मायावतींनी उभारलेल्या पुतळ्यांवर खर्च झालेला पैसा त्यांनी स्वत:च्या खिशातून परत करावा, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

शुक्रवारी एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की, "जनतेचा पैसा कुठल्याही पक्षातील विशिष्ट नेत्याचे पुतळे उभारण्यासाठी खर्च केले जाऊ शकत नाहीत. आणि हत्ती हे बहुजन समाज पक्षाचं निवडणूक चिन्हं आहे."

मोदींच्या 'न्यू इंडिया'त ग्रामीण भारत नाही का?

लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शेवटचं भाषण राजकीय अर्थाने भारलेलं होतं.

लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी

फोटो स्रोत, LS TV SCREENGRAB

फोटो कॅप्शन, लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांबाबत केलेल्या तरतुदींबाबत ते चांगल्या प्रकारे बोलले. मात्र रोजगारनिर्मितीच्या आश्वासनाबाबत आणि कृषी क्षेत्राबाबत त्यांनी बचावात्मक भूमिका घेतली. फ्रान्सबरोबर झालेल्या रफाल व्यवहारातील कथित अनियमिततेबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तर देताना पंतप्रधान आक्रमक झाले होते.

परंतु GST आणि नोटाबंदीमुळे झालेला परिणाम तसंच शेतीचे प्रश्न यांना अगदी भाषणाच्या शेवटी स्थान देण्यात आलं होतं. कदाचित या विषयांवर बोलण्यासारखं त्यांच्याकडं फारसं काही नसावं किंवा अशा पेचात टाकणाऱ्या मुद्द्यांपासून त्यांना स्वतःचं रक्षण करायचं होतं.

RightToChoose: रहमानचं ट्रोल्सना प्रत्युत्तर

संगीतकार ए. आर. रहमान यांनी शेअर केलेल्या आपल्या मुलींच्या काही फोटोंवरून वाद झाला आहे. या फोटोमध्ये ए. आर. रहमान यांच्या दोघी मुली खतिजा, रहिमा आणि पत्नी सायरा बानो रिलायन्सच्या इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानींसोबत उभ्या आहेत.

पण या फोटोत रहमान यांची मुलगी खतिजा बुरख्यात दिसून येत आहे. आणि इतर रहिमा आणि सायरा बुरख्याशिवाय उभ्या आहेत. हा फोटो 'स्लमडॉग मिलेनियरची दहा वर्षं' साजरी करण्यासाठी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात घेण्यात आला होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

यात खतिजाला तिच्या वडिलांविषयी आणि त्यांच्या यशाबद्दल बोलण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आलं, तेव्हा ती साडी नेसून आली होती, पण तिने आपला चेहरा झाकलेला होता. रहमान यांनी जसा हा फोटो ट्विटरवर शेअर केला, तसा प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काही लोकांनी त्यांना ट्रोलही केलं.

ट्रंप-किम भेट व्हिएतनाममध्ये का?

व्हिएतनामच्या हनोई शहरात अमेरिका आणि उत्तर कोरिया एकत्र येणार आहेत. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे येत्या 27-28 फेब्रुवारीला व्हिएतनामध्ये दुसऱ्यांदा भेटणार आहेत.

भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेला कम्युनिस्ट व्हिएतनाम आता दोन्ही देशांचा म्हणजे अमेरिका आणि उत्तर कोरिया यांचा मित्र देश मानला जात आहे.

किम जाँग उन आणि डोनाल्ड ट्रंप हे येत्या 27-28 फेब्रुवारीला व्हिएतनामध्ये दुसऱ्यांदा भेटणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किम जाँग उन आणि डोनाल्ड ट्रंप हे येत्या 27-28 फेब्रुवारीला व्हिएतनामध्ये दुसऱ्यांदा भेटणार आहेत.

"व्हिएतनाममधली ट्रंप-किम भेट ही केवळ प्रतिकात्मक नाहीये. या भेटीसाठी व्हिएतनाम हा देश संपूर्ण सुरक्षा पुरवू शकतो, हे यातून दाखवायचं आहे. व्हिएतनाम हा तटस्थ असल्याचं दोन्ही पक्षांनी मान्य केलं आहे," असं व्हिएतनाम राष्ट्राचे विश्लेषक कार्ल थेयर यांनी बीबीसीला सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)