ट्रान्सजेंडर योगेश्वरीची पोलीस भरतीसाठी तयारी...

ट्रान्सजेंडर योगेश्वरीची पोलीस भरतीसाठी तयारी...
Published

योगेश्वरी फड हिनं परभणी जिल्ह्यातील पोलीस भरतीत तृतीयपंथीय गटातून अर्ज केला आहे.

शासनाने तृतीयपंथीयांना अर्जाची सोय तर केली, पण ते केवळ दाखवण्यापुरतं होतं, अशी तिची तक्रार आहे.

कारण नियमांनुसार यंदा तृतीयपंथीयांचे अर्ज हे खुल्या सर्वसाधारण गटात समाविष्ट करून घेण्यात आले आहेत. योगेश्वरी सांगते, “मला आत्मसन्मानासाठी पोलीस व्हायचं आहे. समाज माझ्याकडे ज्या नजरेने पाहतो, तसा पुढच्या पिढीतील तृतीयपंथीयांकडे पाहू नये, यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे.”

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)