You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
100 कोटी भारतीयांकडे खर्चायला पैसेच नाहीत?
100 कोटी भारतीयांकडे खर्चायला पैसेच नाहीत?
Published
भारतातल्या देशातल्या 140 कोटी लोकांपैकी जवळपास 100 कोटी लोकांकडे त्यांना हव्या त्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी पैसेच नाहीत. ब्लूम व्हेन्चर्स या कंपनीने हा अहवाल प्रकाशित केलाय.
देशात फक्त 13 ते 14 कोटीच लोक आहेत जे त्यांना हव्या त्या गोष्टी विकत घेऊ शकतात. आणखी 30 कोटी लोक याच वर्गात जाण्याच्या मार्गावर आहेत, असंही अहवालात म्हटलं आहे.
हे ग्राहक फार विचारपूर्वकच खर्च करतात. जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ घातलेल्या भारतातले ग्राहक वाढत नाहीयत, उलट घटतायत असा या अहवालाचा दावा आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)