दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

Published

नेपाळ येथे 6.3 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तराखंड, दिल्ली, मणिपूर, उत्तर प्रदेशातही जाणवले.

उत्तराखंडातील पिठोरागडजवळ 4.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला असे भारतीय भूगर्भशास्त्र केंद्राने सांगितले आहे.

या भूकंपात 6 जणांचा मृत्यू झाल्याचे बीबीसी नेपाळी सर्व्हिसने सांगितले आहे. नेपाळमधील दोती या ठिकाणी 6 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भूकंपाच्या धक्क्याने घर कोसळून मनुष्यहानी झाली. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

हे ही वाचलंत का?