You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर जुन्या संसदेचं काय होणार? जाणून घ्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे 2023 रोजी संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन करणार आहेत.
काँग्रेससह 19 विरोधी पक्षांनी संसदेच्या या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.
संसदेच्या या नवीन इमारतीचं उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं, असं काँग्रेससह विरोधकांचं म्हणणं आहे.
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानंतर जुन्या इमारतीचं काय होईल, नवीन इमारत कशी दिसेल, नव्या इमारतीची आवश्यकता का पडली, जुनी इमारत तोडली जाईल का, या प्रश्नांसह अनेक प्रश्न गुगलपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपर्यंत सर्वत्र शोधली जात आहेत.
2. WTC Final : भारतीय क्रिकेट संघासमोरचं नवं मिशन काय?
दोन महिने आयपीएल स्पर्धेत खेळल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत.
7 जून पासून लंडनमधल्या ओव्हल इथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा मुकाबला होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे टेस्ट प्रकाराचा वर्ल्डकप.
टेस्ट अर्थात कसोटी प्रकाराची लोकप्रियता कमी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आयोजित करायला सुरुवात केली आहे.
दोन वर्षांदरम्यान ही चॅम्पियनशिप आयोजित केली जाते. वाचा, या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतासमोरचं आव्हान काय आहे?
3. बेने इस्रायली ज्यू मंडळींनी सुरू ठेवलेली मराठी कीर्तनाची परंपरा तुम्हाला माहिती आहे का?
महाराष्ट्रात राहाणाऱ्या नव्हे भारतात राहाणाऱ्या कोणत्याही माणसाला कीर्तन हा शब्द माहिती नसेल असं होणारच नाही.
वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपला कीर्तनाशी संबंध आलेला असतो. किंबहुना आजही कीर्तनाबद्दल काही वाचलं, ऐकलं किंवा पाहिलं की अनेक लोकांचं मन थेट त्यांच्या बालपणात जाऊन पोहोचतं.
खास भारतीय वाद्यांसह, वादकांसह केलं जाणारं कीर्तन हे भारतातील अनेक प्रांतांमध्ये भक्तीसाठी लोकप्रिय माध्यम म्हणून वापरलं गेलं.
भक्तीबरोबरच अध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधनासाठीही त्याचा वापर केला गेला. केवळ हिंदू धर्मातच नव्हे तर शीख, बौद्ध धर्मातही कीर्तनसदृश्य माध्यमांचा वापर झालेला दिसून येतो.
4. कुस्तीपटू आंदोलनाबाबत महाराष्ट्रातले पैलवान, कुस्ती प्रशासक गप्प का?
पैलवान विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियानं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनानं भारतीय कुस्तीचं विश्व ढवळून निघालं आहे.
बृजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला पैलवानांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप पैलवानांनी ठेवले आहेत. बृजभूषण यांनी ते आरोप नाकारले आहेत.
सरकारनं या प्रकरणी चौकशी समितीही तयार केली होती. पण कुठलीच कारवाई न झाल्यामुळे 23 एप्रिलपासून पैलवानांनी परत दिल्लीच्या जंतर-मंतर इथे धरणं सुरू केलं.
खरं तर हे प्रकरण आता कोर्टात पोहोचलं आहे पण दरम्यान, भारतीय कुस्तीतही दोन गट पडल्याचं चित्र आहे.
5. अहमदनगर होणार अहिल्यानगर, पण औरंगाबादचं नाव अद्याप संभाजीनगर का झालं नाही?
अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून 'अहिल्यानगर' करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्याच चौंडीमध्ये केली आहे.
दर काही महिन्यांनी एखाद्या शहराचं, जिल्ह्याचं नाव बदलण्याची चर्चा होते. पण अशा नामांतरांचा अधिकार नेमका कुणाला आहे - राज्य सरकारला की केंद्र सरकारला?
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)