सतीश कौशिक यांचा 'हा' व्हीडिओ ठरला शेवटचा ...

सतीश कौशिक यांचा 'हा' व्हीडिओ ठरला शेवटचा ...
Published

अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा हा शेवटचा व्हीडिओ असल्याचं बोललं जातंय.

सतीश कौशिक यांचं दिल्लीजवळ गुरुग्राम इथे निधन झालं. ते 67 वर्षांचे होते.

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक गुरगाव इथे 8 मार्चला होळीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या व्हीडिओमध्ये स्वतः कौशिक होळी साजरी करताना दिसतायत. मात्र, हा त्यांचा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हीडिओ ठरलाय, कारण 9 मार्चला त्यांच्या निधनाचं वृत्त पुढे आलं.

तत्पूर्वी 7 मार्चला मुंबईत सुद्धा ते एका होळीच्य कार्यक्रमात दिसले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर बॉलिवुडवर शोककळा पसरलीय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)