You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी
पुण्यात आज(14 जानेवारी) 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामना पार पडला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकवण्यासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली.
यामध्ये शिवराज राक्षेनं विजय मिळवत तो महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केलं की, "पुणे जिल्ह्यातील पैलवान शिवराज राक्षे याने अतिशय थरारक लढतीत चीतपट कुस्ती करून यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला . सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन!"
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट केलं की, “अभिमानास्पद! आपल्या खेडचा सुपुत्र शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन! शिवराज आपण महाराष्ट्र व देशाचं प्रतिनिधित्व करून अशीच चमकदार कामगिरी करत राहो, याच शुभेच्छा!”
काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं, “पुणे येथे झालेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे या कुस्तीपटूने 'महाराष्ट्र केसरी' हा मानाचा किताब पटकावला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! सामान्य घरातील शेतकऱ्याच्या मुलाने मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे.”
लातूरचे खासदार आणि भाजप नेते सुधाकर श्रंगारे यांनी ट्विट केलं की, “दुहेरी अभिनंदन! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडचे पैलवान शिवराज राक्षे यांनी मानाची गदा पटकावल्याबद्दल व औसा तालुक्यातील टाका येथील पैलवान आकाश देशमुख यांनी 74 किलो गटात रौप्यपदक जिंकून लातूर जिल्ह्याची मान उंचावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)