You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
13 दिवसांत उभारलेला सेट एका रात्रीतून पाडला तेव्हा... नितीन देसाईंनी सांगितलेला तो किस्सा
प्रसिद्ध चित्रपट आणि कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचं वयाच्या 57व्या वर्षी निधन झालं. कर्जतमधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
दापोलीमध्ये जन्मलेले नितीन चंद्रकांत देसाई यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शन, प्रॉडक्शन डिझायन आणि निर्मिती केली आहे. लगान, हम दिल दे चुके सनम, देवदास, जोधा अकबर, स्वदेस, प्रेम रतन धन पायो (2015) असे अनेक मोठे हिंदी सिनेमे आणि ‘बालगंधर्व’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ सारख्या मराठी सिनेमांचे सेट त्यांनी तयार केले होते. याशिवाय ‘तमस’, ‘चाणक्य’ अशा गाजलेल्या मालिकांचे सेटही त्यांनी तयार केले होते.
त्यामुळे सिनेक्षेत्रात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. पाहा त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांनी सांगितलेला एक किस्सा...
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)