सेक्सद्वारे पसरणारे आजार कोणते? तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात दररोज दहा लाखांहून अधिक लोकांना नव्याने लैंगिक संबंधातून संसर्ग म्हणजेच सेक्सशु्ली ट्रान्समिटेड इन्फेक्शन (एसटीआय) होतात. पण ‘एसटीआय’ म्हणजे नक्की काय, त्याचे प्रकार आणि लक्षणं काय आहेत आणि आपण त्यापासून सुरक्षित कसं राहू शकतो?
लैंगिक संबंधातून होणारे संसर्ग (एसटीआय) हे लैंगिक संभोग किंवा लैंगिक संपर्काद्वारे एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीला होतात.
जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ) नुसार जगभरात दररोज 10 लाखांहून अधिक लोकांना लैंगिक संबंधातून संसर्ग होतो.
सहसा या संसर्गाची लक्षणं दिसत नाहीत आणि ती शोधणंही कठीण असतं. विशिष्ट रोगांमुळे जेव्हा संसर्ग झाल्याचं लक्षात येतं आणि विशिष्ट लक्षणं दिसू लागतात, तेव्हा त्याला लैंगिक संबंधातून होणारे रोग (एसटीडी) म्हटलं जातं.
एटीआय सहसा लैंगिक संभोगादरम्यान पसरतात, परंतु काहीवेळा ते त्वचेला त्वचेच्या होणाऱ्या इतर लैंगिक संपर्कामुळे होऊ शकतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
काही एसटीआयचा गर्भधारणेदरम्यान, बाळंतपणात किंवा स्तनपानादरम्यान आईकडून बाळालादेखील संसर्ग होऊ शकतो.
रक्तातील संक्रमण किंवा एकाच सुईचा अनेकांसाठी वापर इत्यादी विविध कारणांमुळेदेखील एसटीआयचा प्रसार होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
एसटीआयमुळे कर्करोग, ओटीपोटात तीव्र वेदना, एक्टोपिक गर्भधारणा आणि वंध्यत्व यांसारख्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.
एसटीआयचे प्रकार काय आहेत?
लैंगिक संपर्कामुळे जवळपास 30 पेक्षा अधिक वेगवेगळे जीवाणू, विषाणू आणि परजीवीचा संसर्ग होऊ शकतो.
व्यक्तींना एकाच वेळी अनेक एसटीआय देखील असू शकतात.
सिफिलीस, गोनोरिया, क्लॅमिडीया आणि ट्रायकोमोनियासिस हे सर्वात सामान्यपणे आढळणारे एसटीआय आहेत. या सर्व संसर्गांवर उपचार केले जाऊ शकतात.
लक्षणं काय आहेत?
लैंगिक संबंधातून होणाऱ्या संसर्गाची सामान्यपणे लक्षणं दिसत नाहीत किंवा केवळ सौम्य लक्षणं दिसू शकतात. नकळतपणे संसर्ग होण्याची शक्यता असते.
परंतु लक्षणं नसतानाही लैंगिक संभोगातून संसर्ग होऊ शकतो आणि ते अपायकारक ठरू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
लक्षणं आढळल्यास, त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
- पुरुषाचं जननेंद्रिय किंवा योनीतून असामान्य स्त्राव होणे
- जननेंद्रियाच्या भागावर जखम किंवा फोड येणे
- जळजळ होणारी किंवा वारंवार होणारी लघवी
- जननेंद्रियाच्या भागात खाज सुटणे आणि लालसरपणा
- जननेंद्रियाच्या मुखाला किंवा आजूबाजूला जखम होणे किंवा फोड येणे
- योनीतून दुर्गंध येणे
- गुदद्वाराला खाज सुटणे, वेदना किंवा रक्तस्त्राव होणे
- पोटदुखी
लैंगिक संबंधातून होणारे संसर्ग सामान्य का आहेत?
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार 2020 मध्ये झालेल्या 374 दशलक्ष संसर्गापैकी एसटीआयच्या सर्वात सामान्य चार प्रकारांपैकी किमान एक नव्याने संक्रमित झाला होता: ट्रायकोमोनियासिस (156 दशलक्ष), क्लॅमिडीया (129 दशलक्ष), गोनोरिया (82 दशलक्ष) आणि सिफिलीस (सात दशलक्ष).
2016 मध्ये 490 दशलक्षाहून अधिक लोक जेनिटल हर्पिससह जगत असल्याचा अंदाज आहे आणि अंदाजे 300 दशलक्ष लोकांना एचपीव्ही संसर्ग झाल्याचं मानलं जातंय, तसंच डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं प्राथमिक कारण आणि ज्या पुरुषांनी पुरुषांसोबतच लैंगिक संबंध ठेवले त्यांना गुदद्वाराचा कर्करोग झाल्याचं दिसून आलंय.
“सेक्स ही शारीरिक गरज आहे. हे खाण्यापिण्यासारखं आहे, हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे,” असं डब्ल्यूएचओ मधील ग्लोबल एचआयव्ही, हिपॅटायटीस आणि एसटीआय कार्यक्रमांच्या प्रमुख डॉ. टेओडोरा एलविरा सी. वाय म्हणाल्या.
“तुम्ही सेक्स करता आणि जेव्हा तुम्ही सेक्स करता तेव्हा तुम्हाला एसटीआय होऊ शकतात. म्हणूनच संसर्गाचं प्रमाण खूप जास्त आहे. ”

फोटो स्रोत, Getty Images
अनेकदा एसटीआय लक्षणं नसलेले असल्याने, लोकांकडून नकळतपणे याचा संसर्ग होऊ शकतो, या वस्तुस्थितीकडेही डॉ. वाय लक्ष वेधतात.
डॉ वाय यांच्या म्हणण्यानुसार, कॅज्युअल सेक्सविषयी बदलत चाललेल्या धारणांमुळे, लोकांना लैंगिक संबंध ठेवणं सहजसोप्पं झाल्याने आणि एकापेक्षा अधिक लैंगिक जोडीदार असणं, आणि डेटिंग अॅप्सचा वाढत्या वापरामुळे एसटीआय होण्याचा धोका वाढत चाललाय.
अलिकडच्या अभ्यासानुसार अविवाहित तरुणांमध्ये कॅज्युअल सेक्सचं प्रमाण कमी झाल्याचं दिसत असलं, तरी कंडोमचा वापर करण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतंय.
ज्यावेळी एचआयव्हीवर उपचार उपलब्ध नव्हते तेव्हा लोकं कॅज्युअल सेक्सबाबत, मुख्यत्वेकरून कंडोमशिवाय संबंध ठेवण्याबाबत सावधगिरी बाळगत, यावर डॉ. वाय यांनी भर दिला.
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.
























