You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार मुलाखत: युगेंद्र पवारांविरोधात बारामती लढवणं किती सोपं? किती कठीण?
बारामतीत तर गेल्या दोन-तीन दशकात सहजपणे पाहायला मिळालं नाही, असं चित्र हल्ली दिसून लागलंय. ते म्हणजे, स्वत: अजित पवार त्यांचं होमग्राऊंड असलेल्या बारामती मतदारसंघात प्रचारात उतरलेत.
एरव्ही दर निवडणुकीला अजित पवार राज्यभर पक्षाचा प्रचार करायचे आणि बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबीय त्यांचा प्रचार सांभाळायचे. पण यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांनी बारामतीतलं चित्रच पालटून टाकलंय.
कारण अर्थात तिथे आहेत पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक. आणि अजित पवार यांना आव्हान देत आहेत त्यांचे पुतणे युगेंद्र पवार.
या निवडणुकीसाठी अजित पवार कशी तयारी करत आहेत? काय मुद्दे घेऊन ते बारामतीकरांमध्ये जात आहेत?
पाहा मयुरेश कोण्णूर यांनी घेतलेली ही मुलाखत.
शूट-एडिट - शरद बढे