भाजपचा विरोध झुगारून अजित पवारांनी तिकीट का दिलं? नवाब मलिक यांनी सांगितलं कारण

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

माजी मंत्री नवाब मलिक हे मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

नवाब मलिकांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळालं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. कारण अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या भाजपप्रणित महायुतीत आहे. त्यामुळे एकेकाळी जी भाजप नवाब मलिकांवर टीका करत होती, त्याच भाजपच्या मित्रपक्षानं मलिक यांना उमेदवारी दिलीय

भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले की, नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, तसंच शिंदे गटानं उमेदवार दिलाय. मात्र, अजित पवारांनी अधिकृतरित्याच मलिकांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे भाजप आपल्या पद्धतीने सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

दुसरीकडे, नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे की, अजित पवारांनी माझ्या कुटुंबाला आधार दिल्यानं त्यांच्यासोबत राहणं हे माझं कर्तव्य आहे.

बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी नवाब मलिक यांची मुलाखत घेऊन, सर्व प्रश्नांवर सविस्तर बातचित केली आहे.