शिर्डीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 10 साईभक्तांचा मृत्यू, अनेकजण जखमी

फोटो स्रोत, Pravin Thackeray/BBC
नाशिकमधील सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघाताची दुर्घटना घडलीय. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू, तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन ही अपघाताची दुर्घटना घडली. आज (13 जानेवारी 2023) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
सिन्नर-शिर्डी महामार्गावरील वावी पाथरे गावाजवळ हा अपघात झाला.

फोटो स्रोत, Pravin Thackeray/BBC
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून 15 बस साईबाबांच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. अपघातग्रस्त बस ही त्यातलीच एक बस आहे.
अपघातग्रस्त बसमध्ये ठाण्यातील अंबरनाथमधील 50 भाविक होते. या बसला अपघात झाल्यानंतर त्याली 10 जणांचा मृत्यू, तर उर्वरीत प्रवासी गंभीर जखमी झाले.

फोटो स्रोत, Pravin Thackeray/BBC
अपघाताच्या चौकशीचे दिले निर्देश
नाशिक शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली.
जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























