You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठीचे पत्रकार श्रीकांत बंगाळे यांना रामनाथ गोएंका पुरस्कार
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांना प्रतिष्ठेच्या 'रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नलिझम' पुरस्काराने गौरवण्यात आलं. इंडियन एक्स्प्रेस समूहातर्फे हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. राजधानी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते श्रीकांत यांना सन्मानित करण्यात आलं.
श्रीकांत यांना 'महाराष्ट्राच्या मसाला क्वीनचं कंबरडं कोणी मोडलं' या बातमीसाठी सन्मानित करण्यात आलं.
ही स्टोरी तुम्ही इथे पाहू शकता.
श्रीकांत यांनी गावाकडच्या गोष्टींच्या माध्यमातून शेतीचे तसंच ग्रामीण भागाचे प्रश्न, सरकारी योजनांसाठी कशा पद्धतीने कागदपत्रांची सिद्धता कशी करायची याचं वृत्तांकन तुम्हाला इथे वाचता येईल.
दोन वर्षांपूर्वी श्रीकांत यांना मुंबई प्रेस क्लबतर्फे देण्यात येणाऱ्या रेड इंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
महिला सक्षमीकरण आणि लिंग समानता या श्रेणीत श्रीकांतच्या यांच्या बातमीला मानांकन मिळालं होतं.
घरातील तीन व्यक्तींनी आत्महत्या केल्यानंतरही खचून ना जाता जिद्दीने उभं राहत 29 एकरांची शेती सांभाळणाऱ्या ज्योती देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी श्रीकांत यांनी मांडली होती.
ज्योती देशमुख यांचा व्हीडिओ बीबीसीच्या राहुल रणसुभे यांनी एडिट केला होता.
दरवर्षी मुंबई प्रेस क्लबतर्फे पत्रकारितेतील विविध विषयांवर सखोल वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार दिले जातात.
बीबीसी मराठीने नेहमीच सर्वसामान्य माणसांना भेडसावणारे प्रश्न हिरिरीने मांडले आहेत. याबरोबरीने प्रवाहाविरुद्ध जाऊन वेगळी वाट चोखाळणाऱ्या माणसांच्या गोष्टी तुमच्यासमोर आणल्या आहेत. समाजाचे विविधांगी पदर उलगडून दाखवणाऱ्या गोष्टीही तुमच्यासाठी सादर केल्या आहेत. अशाच पुरस्कारप्राप्त बातम्या, व्हीडिओंचा घेतलेला आढावा.
फूटपाथवर राहून अभ्यास करणारी आस्मा
बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांना लाडली पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. आस्मा शेख या फूटपाथवर राहणाऱ्या मुलीच्या संघर्षावर बीबीसी मराठीने ग्राऊंड रिपोर्ट केला होता. या रिपोर्टसाठी दीपाली यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बीबीसी मराठीच्या बातमीने आसमाच्या आयुष्यात कसा बदल झाला हे तुम्ही इथे वाचू शकता.
पोर्तुगीज भाषा बोलणारं मराठमोळं गाव
रायगडच्या कोर्लई गावात पोर्तुगीज मिश्रित नॉलिंग भाषा बोलली जाते. या गावकऱ्यांची गोष्ट बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नामदेव काटकर यांनी मांडली होती. ही स्टोरी तुम्ही इथे पाहू शकता. या बातमीला मुंबई प्रेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या रेड इंक पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लढणारी स्कुटीवाली बाई
महिलांना शेतजमिनीची मालकी अनेकदा नाकारली जाते. 'हक्काच्या जमिनीसाठी लढणारी स्कुटीवाली बाई' या बातमीसाठी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अनघा पाठक यांना लाडली पुरस्काराने गौरवण्यात आलं. ही बातमी तुम्ही इथे वाचू शकता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)