मुंबईसह जगातील रहस्यमय खारफुटी जंगलांचं अनोखं विश्व; पाहा थक्क करणारे खास 13 फोटो

दबकत फिरणारे वाघ

फोटो स्रोत, Avijit Ghorai/ Mangrove Photography Awards

    • Author, हॅरिसन जोन्स
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

भेसूर वाटणारी झाडं, दबकत फिरणारे वाघ आणि डॉल्फिनच्या शिकारीचे दुर्मीळ प्रकार यांची छायाचित्रं 2026 च्या मँग्रोव्ह (खारफुटी किंवा कांदळवन) फोटोग्राफी अवॉर्ड्समध्ये पाहायला मिळाली आहेत.

उष्णकटिबंधीय प्रदेशातील झाडं आणि समुद्राचं खारं पाणी जिथे एकमेकांना मिळतात, तिथे मँग्रोव्हजची जंगलं उभी असतात. ही जंगलं जमीन आणि समुद्र यांच्यातील सीमेवर उभी असतात. गूढ आणि अनोखी असलेली ही परिसंस्था जगातील अनेक आकर्षक वन्यजीवांचं घर आहे.

काही दुर्मीळ प्राण्यांना मँग्रोव्हजची जंगलं सुरक्षित आश्रय देतात. तर काही प्राण्यांसाठी ही जंगलं शिकार करण्याचं ठिकाण आहेत.

याचं उदाहरण म्हणजे भारतातील सुंदरबनमध्ये दिसणारं हे रॉयल बंगाल वाघाचं पिल्लू (वरील छायाचित्रात). सुंदरबन हे जगातील सर्वात मोठं मँग्रोव्हज म्हणजेच खारफुटीचं जंगल आहे.

2026 च्या मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्समधील ही छायाचित्रं जगातील मँग्रोव्ह जंगलांचं अद्भुत, विलक्षण असं सौंदर्य आणि त्यांची नाजूक परिसंस्था दाखवतात.

फ्लोरिडापासून इंडोनेशियापर्यंतच्या या स्पर्धेतील 13 खास आणि थक्क करणारी छायाचित्रं इथे पाहता येतील.

नजरेआडचं संकट

स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फोटो म्हणून हा लक्षवेधी फोटो निवडण्यात आला. यात समुद्रात हरवलेलं 'घोस्ट नेट' म्हणजेच टाकून दिलेलं मासेमारीचं जाळं अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात चमकताना दिसत आहे.

गौरव पाटील यांनी मुंबईच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावर हा फोटो टिपला.

नांदगावमध्ये दिसलेलं गुंतलेल्या झाडांचं अनोखं दृश्य. (क्रेडिट: गौरव पाटील/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Gaurav Patil/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, नांदगावमध्ये दिसलेलं गुंतलेल्या झाडांचं अनोखं दृश्य. (क्रेडिट: गौरव पाटील/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

भरती-ओहोटीमुळे सतत पाण्याचा मारा होत असलेल्या ठिकाणी हे जाळं मँग्रोव्हच्या झाडांमध्ये अडकलेलं दिसतं.

अशी फेकून दिलेली मासेमारीची जाळी खारफुटीमध्ये म्हणजेच मँग्रोव्हमध्ये अडकल्यानंतर वन्यजीवांसाठी धोकादायक ठरतात.

थक्क करणारे दृश्य

तोंड उघडून आणि पर उंचावून आपलं क्षेत्र दाखवणारे मडस्किपर मासे. (क्रेडिट- अशोक बेहेरा/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Ashok Behera/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, तोंड उघडून आणि पर उंचावून आपलं क्षेत्र दाखवणारे मडस्किपर मासे. (क्रेडिट- अशोक बेहेरा/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

भारतातील सुंदरबनमध्ये दिसणारे हे 2 रंगीबेरंगी मडस्किपर मासेही खास आहेत. ते जमिनीवर चालू आणि उडी मारू शकतात, तसेच जमिनीवरच श्वासही घेऊ शकतात.

मँग्रोव्हच्या जंगलांप्रमाणेच ते जमीन आणि समुद्राच्या मधल्या म्हणजे संक्रमण भागात वावरतात.

लालसर रंगाचा दुर्मीळ जीव

बहामासमधील बिमिनी येथे मँग्रोव्ह जंगलांकडे पाहणारा दुर्मीळ प्रजातीचा एक बगळा. (क्रेडिट: डिलन रॉबर्ट्स/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Dillon Roberts/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, बहामासमधील बिमिनी येथे मँग्रोव्ह जंगलांकडे पाहणारा दुर्मीळ प्रजातीचा एक बगळा. (क्रेडिट: डिलन रॉबर्ट्स/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

मँग्रोव्हजची झाडं जगभरातील उष्ण आणि उपोष्णकटिबंधीय भागातील 100 हून अधिक देशांच्या समुद्रकिनाऱ्यांवर आणि नदीच्या मुखाजवळ आढळून येतात. बहामासमध्ये हिरव्यागार मँग्रोव्हजच्या झाडांमध्ये हा दुर्मीळ लालसर बगळा सहज उठून दिसतो.

चिखलात मासे पकडण्याची पद्धत

मासे पकडण्यासाठी डॉल्फिन चक्क चिखल ढवळून काढतात. (क्रेडिटः मार्क इयान कुक/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Mark Ian Cook/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, मासे पकडण्यासाठी डॉल्फिन चक्क चिखल ढवळून काढतात. (क्रेडिटः मार्क इयान कुक/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

अमेरिकेमधील फ्लोरिडा बे परिसरातील बॉटलनोज डॉल्फिन अतिशय हुशारीने शिकार करतात. मँग्रोव्हजच्या जंगलांनी वेढलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर त्यांना मुलेटसह विविध प्रकारचे मासे सहज मिळतात.

मासे पकडण्यासाठी डॉल्फिन समुद्राच्या तळातील चिखल ढवळून त्याचा गोलाकार वेढा तयार करतात. या गढूळ पाण्याचा वापर ते जणू जाळ्यासारखा करतात आणि त्यात मासे अडकवतात.

फ्लोरिडा बे मधील डॉल्फिनची ही शिकार करण्याची पद्धत जवळपास अनोखी आहे आणि कॅमेऱ्यात फार क्वचितच कैद होते.

सुरक्षित आसऱ्याच्या शोधात

मँग्रोव्हची जंगलं पाण्याखालीही एक गुंतागुंतीचं आणि वेगळं जग तयार करतात. मुळांच्या जाळ्यातून पोहणाऱ्या या हिरव्या समुद्री कासवाच्या पिल्लाच्या फोटोमधून ते दिसून येतं.

भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढली की, हा भाग अनेक जीवांनी समृद्ध परिसंस्था बनतो. टायगर शार्कसारख्या भक्षकांपासून वाचण्यासाठीही कासवांना इथे आश्रय मिळतो.

बहामासमधील या छायाचित्राला 'इतर प्रजाती' या श्रेणीत पहिला क्रमांक मिळाला. (क्रेडिट: इव्हान कूपर/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Evan Cooper/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, बहामासमधील या छायाचित्राला 'इतर प्रजाती' या श्रेणीत पहिला क्रमांक मिळाला. (क्रेडिट: इव्हान कूपर/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

खारफुटीच्या जंगलांमुळे पाण्याखाली गुंतागुंतीचे अधिवास निर्माण होतात. मुळांच्या जाळ्यातून पोहत असलेल्या या लहान हिरव्या समुद्री कासवाच्या छायाचित्रातून ते दिसते. भरतीमुळे पाण्याची पातळी वाढल्यानंतर हा भाग समृद्ध परिसंस्थेत रूपांतरित होतो आणि टायगर शार्कसारख्या भक्षकांपासून संरक्षण देतो.

फ्लेमिंगोंची वाटचाल

मँग्रोव्हजची झाडं खाऱ्या पाण्यात वाढतात आणि या भागात अनेकदा भरती-ओहोटी होत असते. (क्रेडिट: मार्क इयान कुक/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Mark Ian Cook/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, मँग्रोव्हजची झाडं खाऱ्या पाण्यात वाढतात आणि या भागात अनेकदा भरती-ओहोटी होत असते. (क्रेडिट: मार्क इयान कुक/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फ्लोरिडा बेमधील आणखी एका छायाचित्राला पक्षी या श्रेणीत पहिला क्रमांक मिळाला. या फोटोत अमेरिकन फ्लेमिंगो एका लेमन शार्ककडे बारकाईने पाहताना दिसत आहेत.

मोहून टाकणारी बेटं

Caption- गॅलापागोस बेटं विविध प्रकारच्या समृद्ध वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहेत. (क्रेडिट: पेलायो सॅलिनास दे लिऑन/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Pelayo Salinas de León/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, गॅलापागोस बेटं विविध प्रकारच्या समृद्ध वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहेत. (क्रेडिट: पेलायो सॅलिनास दे लिऑन/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

गॅलापागोस बेटांच्या अगदी जवळ, उथळ मँग्रोव्हच्या खाडीमधून सोनेरी रे मासे पोहत जाताना कॅमेऱ्यात टिपले गेले.

मँग्रोव्हची जंगलं केवळ स्वतः अनेक प्रकारच्या जीवांना आधार देत नाहीत, तर जवळच्या सागरी गवताच्या कुरणांसारख्या आणि प्रवाळांच्या भित्तींना (कोरल रीफ) असलेल्या परिसंस्थांनाही मदत करतात.

स्नूक माशाचा हल्ला

कॅरिबियनमधील मँग्रोव्हमध्ये पोहणारे मासे (क्रेडिट: क्रिस्पिन मिडलटन/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Crispin Middleton/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, कॅरिबियनमधील मँग्रोव्हमध्ये पोहणारे मासे (क्रेडिट: क्रिस्पिन मिडलटन/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

मँग्रोव्हची जंगलं 1500 हून अधिक प्रजातींशी संबंधित आहेत. तसेच अनेक महत्त्वाच्या माशांच्या पिल्लांना वाढण्यासाठी ही जंगलं सुरक्षित जागा देतात. या छायाचित्रात बोनायरमधील लॅक बे येथे माशांचा एक थवा मँग्रोव्हमध्ये आश्रय घेताना दिसत आहे. त्याचवेळी एक स्नूक मासा त्या माशांवर झेपावताना दिसतो.

जमिनीवर उतरताना

मँग्रोव्हजच्या जंगलात इंडियन व्हाइट-आय पक्षी अन्न शोधतो आणि घरटं बांधतो. (Credit: एरफान समनफार/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Erfan Samanfar/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, मँग्रोव्हजच्या जंगलात इंडियन व्हाइट-आय पक्षी अन्न शोधतो आणि घरटं बांधतो. (Credit: एरफान समनफार/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

मँग्रोव्हजची जंगलं जमिनीवरील जंगलांपेक्षा पाचपट जास्त कार्बन साठवू शकतात. त्यांची मुळं समुद्राच्या लाटा आणि पाण्याचा वेग कमी करतात. त्यामुळे वादळाच्या वेळी येणाऱ्या मोठ्या लाटांपासून आणि समुद्राच्या पाण्यापासून किनारपट्टीवरील लोकांचं संरक्षण होतं.

मँग्रोव्हच्या फांद्या पक्ष्यांनाही आश्रय देतात. इराणमधील मँग्रोव्हजच्या झाडावर येऊन बसलेला हा सुंदर इंडियन व्हाईट-आय त्याचं उदाहरण आहे.

जिथून मँग्रोव्हजची सुरुवात होते

भारतातील जंगलमांजरांचे दुर्मीळ दर्शन  (क्रेडिट: कल्लोल मुखर्जी/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Kallol Mukherjee/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, भारतातील जंगलमांजरांचे दुर्मीळ दर्शन (क्रेडिट: कल्लोल मुखर्जी/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

कल्लोल मुखर्जी यांनी काढलेल्या या छायाचित्राला सस्तन प्राणी या श्रेणीत पहिला क्रमांक मिळाला. दाट झाडाझुडपांमध्ये जंगल मांजराची पिल्लं दिसत असून, या वनस्पतींमुळे त्यांना सुरक्षित आसरा मिळतो.

एका अंदाजानुसार, मँग्रोव्हजची जंगलं 15 कोटींपेक्षा जास्त लोकांना किनारपट्टीच्या धोक्यांपासून संरक्षण देतात. ही जंगलं समुद्रकिनारा स्थिर ठेवतात आणि जमिनीची धूप कमी करतात. मँग्रोव्ह मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड (सीओ₂) शोषून साठवून ठेवतात.

प्राचीन प्रकाशाचं प्रतिबिंब

भरतीच्या उथळ पाण्यात तारकांनी उजळलेलं मँग्रोव्हचं जंगल (क्रेडिट: र्यूहेई सुगुरी/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Ryuhei Suguri/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, भरतीच्या उथळ पाण्यात तारकांनी उजळलेलं मँग्रोव्हचं जंगल (क्रेडिट: र्यूहेई सुगुरी/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

स्पर्धेतील 'जमिनीवरून' (ऑन द ग्राऊंड) या श्रेणीतील विजेता फोटो र्यूहेई सुगुरी यांनी काढला आहे. इंडोनेशियातील एका मँग्रोव्हच्या जंगलातलं हे एकाकी झाड आकाशगंगेच्या प्रकाशात उजळून निघालेलं दिसत आहे.

कचऱ्याने भरलेला समुद्र

मँग्रोव्हच्या जंगलांसमोर माणसांकडून अनेक धोके निर्माण झाले आहेत. प्रदूषण हा त्यापैकी एक सर्वात मोठा धोका आहे, हे या छायाचित्रातून स्पष्टपणे दिसतं. जंगलतोड हाही मँग्रोव्हसाठी मोठा धोका आहे.

फिलिपाइन्समधील टाकाऊ कचऱ्याचा महासागर  (क्रेडिट: मिकोल सांचेझ/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

फोटो स्रोत, Michol Sanchez/ Mangrove Photography Awards

फोटो कॅप्शन, फिलिपाइन्समधील टाकाऊ कचऱ्याचा महासागर (क्रेडिट: मिकोल सांचेझ/ मँग्रोव्ह फोटोग्राफी अवॉर्ड्स)

मत्स्यपालन, शेती आणि समुद्राच्या किनारी होणाऱ्या बांधकामांसाठी अनेक ठिकाणी मँग्रोव्हची जंगलं नष्ट केली जात आहेत. त्यासोबतच हवामान बदलाचाही या जंगलांवर परिणाम होत आहे.

तरीही आशा करण्यासारखी एक चांगली बातमी आहे. ग्लोबल मँग्रोव्ह वॉचनुसार, 1985 ते 2025 या काळात जगभरातील मँग्रोव्हच्या जंगलांच्या क्षेत्रफळात एकूण 477.2 चौरस किलोमीटरने (180 चौरस मैल) वाढ झाली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)