You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंजाब : लष्कराच्या कँपमध्ये गोळीबार, चार जवानांचा मृत्यू
पंजाबमधील भटिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला आहे.
पहाटे चार वाजून 35 मिनिटांनी ही घटना घडली. या हल्ल्याला तातडीने प्रत्युत्तर देण्यात आलं.
हा भाग सील करण्यात आला असून शोध मोहीम हातात घेण्यात आली आहे.
याबद्दल अधिक माहिती समोर येत आहे आणि ती वेळोवेळी अपडेट करण्यात येईल.
प्राथमिक माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला नसल्याचं स्थानिक पोलीस अधीक्षक गुलनीत सिंग खुराना यांनी बीबीसी प्रतिनिधी अरविंद छाब्रा यांना सांगितलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
या घटनेशी संबंधित सर्व घटनांचा तपास केला जात आहे. या तळावरुन गायब झालेल्या रायफल्सचा शोध घेतला जात आहे असं लष्कराने स्पष्ट केलं.
लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना घटनेसंदर्भात कळवल्याचं एएनआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
लष्कराने काय म्हटलं आहे?
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, साऊथ वेस्टर्न कमांडने एका पत्रकात म्हटलं आहे की या दुर्देवी घटनेत आर्टिलरी विभागाच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला.
अन्य कोणी जखमी झाल्याचं वृत्त नाही. याव्यतिरिक्त काही नुकसान झालेलं नाही.
पहाटे साडेचारच्या बेतात हा हल्ला झाला. काही दिवसांपूर्वी गायब झालेल्या INSAS रायफल आणि 28 काडतूसांचा शोध घेतला जात आहे.
भटिंडा मिलिट्री स्टेशन हे सगळ्यात मोठ्या दारुगोळा आगारांपैकी एक आहे. हा तळ निवासी भागापासून दूर आहे.
या घटनेत गायब झालेली रायफल आणि काडतुसांचा वापर तर करण्यात आलेला नाही याचा लष्कर आणि पंजाब पोलीस तपास करत आहेत.
या सगळ्यामागे लष्करातल्या कुणाचा सहभाग तर नाही याचाही शोध घेतला जात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)