'व्हर्जिन आहे का? विचारलं, अॅक्टिंग शिकवण्याच्या बहाण्याने केला बलात्कार', पीडितेची आपबीती

फोटो स्रोत, Georgie Baker
सूचना - या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात
(नेटफ्लिक्सच्या सेक्स एज्युकेशन या सीरिजमध्ये झळकलेला आणि अभिनयाचे प्रशिक्षण देणारा अलेक्झांडर वेस्टवूडला गेल्या वर्षी बलात्कार आणि लैंगिक छळाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली. त्याने आपला कसा छळ केला होता. त्यानंतर आपल्या मनात स्वतःविषयी कशी घृणा निर्माण झाली याबाबत एका तरुणीने आपले अनुभव सांगितले आहेत. या तरुणीकडे नाव जाहीर न करण्याचा अधिकार होता पण तिने आपल्यासोबत काय घडले हे जाहीररीत्या सांगायचं ठरवलं.)
अभिनयाचे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने 16 व्या वर्षी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
हा प्रशिक्षक नेटफ्लिक्सच्या सेक्स एज्युकेशन या सीरिजमध्ये झळकला आहे. या शिक्षकाने माझं अभिनेत्री होण्याचे स्वप्न उद्ध्वस्त केले आणि मला माझ्याच बद्दल ओंगळवाणं वाटेल अशी स्थिती त्याने निर्माण केल्याचे या तरुणीने सांगितले.
ओलिव्हिया वुडारोविचने नाव जाहीर होऊ न देण्याचा अधिकार न वापरता स्वतः आपल्यासोबत काय घडले हे सांगितले.
डिसेंबर 2020 मध्ये तिने अलेक्झांडर वेस्टवूडकडून अॅक्टिंग शिकण्यास सुरुवात केली होती. वेस्टवूडच्या फ्लॅटचे रिनोव्हेशन (नुतनीकरण) सुरू होते तेव्हा त्याची आणि ओलिव्हियाच्या आईची भेट झाली.
तसं पाहायला गेलं तर ओलिव्हिया सुरक्षित राहिली असती पण श्रॉपशायर मधील ऑलब्रायटनच्या वेस्टवूडने अॅक्टिंग क्लासच्या बहाण्याने तिचा बलात्कार आणि लैंगिक छळ केला.

फोटो स्रोत, West Midlands Police
फेब्रुवारी 2025 मध्ये वेस्टवूडला 15 वर्षं आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याच्या अॅक्टिंग क्लासमध्ये आलेल्या लहान मुलांना आणि दोन विद्यार्थ्यांसोबत केलेल्या एकूण 26 गुन्ह्यांत तो दोषी सिद्ध झाला.
त्यावेळी तिच्यासोबत काय घडले होते ओलिव्हियाने सांगितले.
प्रत्यक्ष शिकवणीच्या वेळी ती एकटीच असे. सुरुवातीला वेस्टवूड शांत वाटत होता. तिला त्याच्यासोबत सुरक्षित वाटले.
मात्र तिसऱ्याच लेसनला त्याने तिला त्याच्यासमोरच कपडे बदलण्यास सांगितले असे तिने म्हटले. त्याने असा दावा केला की थिएटरच्या बॅक स्टेजला असं कपडे बदलणं नेहमी होतं. त्याने हे देखील विचारले की ती व्हर्जिन आहे का?
ओलिव्हियाच्या म्हणण्यानुसार जानेवारी 2021 मध्ये 20 वर्षीय वेस्टवूडने तिला त्याच्यासमोरच हस्तमैथुन करण्यास सांगितले. त्याने सांगितले की 'मी तुझा शिक्षक आहे त्यामुळे मी जे सांगेल ते तुला करावेच लागेल.'
त्याच महिन्यात त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.
"तो मला हस्तमैथुन कसं करायचं हे शिकवेल आणि त्याने माझ्या अंतर्वस्त्रात हात घातला," असे ओलिव्हिया वुडारोविचने सांगितले.
"त्यानंतर त्याने माझा बलात्कार केला - त्या वेदनेमुळे मला ओरडावे वाटत होते."
"पण मी पूर्णपणे सुन्न झाले होते. माझ्या चेहऱ्यावरुन अश्रूंचे ओघळ वाहत होते. त्याने मला अशा प्रकारे घट्ट पकडलं होतं की, मी हालचालही सुद्धा करू शकत नव्हते किंवा त्याला ढकलू देखील शकत नव्हते. अशी माझी व्हर्जिनिटी गेली."

फोटो स्रोत, Georgie Baker
त्यानंतर पुढच्याच महिन्यात अॅक्टिंग क्लासमध्ये मी नेटफ्लिक्सच्या 'ब्रिजरटन' या सीरिजची तालिम केली. त्यानंतर त्याने ओरल सेक्स करण्याची मागणी केली.
तिने हे क्लासेस थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाला की 'तू करारानुसार हे करू शकत नाही.' करारानुसार 365 लेसन्स घ्यावे लागतील अन्यथा 36,000 पाउंड (अंदाजे 45 लाख रुपये) द्यावे लागतील.
मी गैरहजर राहिले तर माझ्या आईला कळवणार असं त्याने सांगितले त्यामुळे तिला त्याविरोधात काहीच बोलता येत नाहीत.
ओलिव्हियाने सांगितले की एकूण चार वेळा वेस्टवूडने तिच्यावर बलात्कार केला.
ऑगस्ट 2021मध्ये तिने तिच्या आई आणि पोलिसांना याबाबत सांगितले पण पुराव्याअभावी ही केस बंद करण्यात आली.
एप्रिल 2023 मध्ये पुन्हा या केसचा तपास सुरू करण्यात आला त्यानंतर अनेक पीडित व्यक्ती समोर आल्या.
या मध्ये अशा एका मुलीचा समावेश होता जेव्हा ती सहा वर्षांची होती आणि त्यावेळी वेस्टवूड हा 10 वर्षांचा होता. एक मुलगाही समोर आला तो 9-10 वर्षांचा होता आणि वेस्टवूड तेव्हा 18 वर्षांचा होता.
त्याचबरोबर एक महिला आणि अॅक्टिंग क्लासेस घेणारी दुसरी एक किशोरवयीन मुलगी देखील समोर आली होती. ओलिव्हिया सध्या 21 वर्षांची आहे आणि ती नाट्यशास्त्रात पदवीधर आहे.
ती वेस्ट मिडलँडमध्ये राहते. तिने सांगितले की,"मला अजून त्या गोष्टीचे स्वप्नं पडतात आणि मी शॉवरमध्ये माझ्या शरीराला घासून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते."

फोटो स्रोत, Georgie Baker
ओलिव्हियाने सांगितले की या जाणिवेनी ती अस्वस्थ होते की जर तिला मुलं झाली तर ती मुलं आणि वेस्टवूड ज्या जगात राहतो त्याच जगात राहतील.
ओलिव्हिया म्हणते की त्याला जितकी शिक्षा झाली त्याहून अधिक काळ तो तुरुंगात सडला पाहिजे.
तपास आणि चौकशीचा अनुभव देखील भयंकर होता असं ओलिव्हियाचे म्हणणे आहे. ती सांगते की त्या काळात तिच्याकडे DNA किट्स घरी उपलब्ध असायला हव्या होत्या. कारण तिला त्यावेळी फॉरेन्सिक तपासणीला स्वतः उपस्थित राहावे लागायचे.
ती सांगते की, "तपासाच्या वेळी माझ्या जननेंद्रियात कॅमेरा टाकला जाऊन तपासणी केली जायची. त्या ठिकाणी काही झाले आहे की नाही ते तपासले जायचे. मी खूप रडत असे आणि या पूर्ण तपासणीदरम्यान माझ्या आईचा हात पकडून ठेवायची."
"मला असं वाटतं की तपासणी घरी करता आली पाहिजे होती. ती थोडी कमी त्रासदायक ठरली असती. आणि त्यांना काही पुरावे देखील सापडले नाहीत, किंवा माझ्या काही जखमा असल्याचे देखील सापडले नाही काही कारण शेवटचा बलात्कार काही महिन्यांआधी झाला होता."
नंतर केस पुढे नोव्हेंबर 2024मध्ये वॉल्वरहॅम्पटनच्या क्राउन कोर्टात गेली.
तिने सांगितले की मी असा निर्धार केला होता की, पुरावे देताना आणि उलट तपासणीवेळी 'मी दुर्बल आहे असं कोणत्याच गोष्टीमुळे दाखवणार नाही.'
"त्या व्यक्तीसोबत पुन्हा एकाच छताखाली उभं राहताना मला स्वतःची घृणा वाटली", असं तिने म्हटले.
शिक्षा ठोठावताना न्यायाधीश नील चावला म्हणाले की, "वेस्टवूडने आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा फायदा घेत पीडित व्यक्तींना जाळ्यात खेचले. आणि अभिनयाचे धडे देणं हे सांगणं लैंगिक छळ करण्यासाठीचा केवळ बहाणा होता."
या घटनेनंतर कसे परिणाम झाले याबद्दल ओलिव्हियाने सांगितले की, "शिक्षण घेत असताना जर बलात्कार आणि लैंगिक छळाबद्दल काही चर्चा झाली तर मला त्या प्रसंगांची आठवण होऊन मनाला तीव्र वेदना होत असत.
या अनुभवांमुळे मासिक पाळी अनियमतपणे येत असे आणि आहारबद्दल च्या समस्या झाल्या आणि रोमँटिक रिलेशनशिपमध्ये अवघडलेपण जाणवत असे."
मात्र आता आपली कहाणी सांगितल्यानंतर आणि इंस्टाग्रामवर बॉडी पॉझिटिव्हिटीबद्दल पोस्ट केल्यानंतर तिला पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वास जाणवतो असे तिने सांगितले.
"लोकांनी स्वतःवर प्रेम करायला शिकावे आणि आयुष्यात पुढे जायला शिकावे याबाबत मला लोकांना प्रेरणा द्यायची आहे," असं ती सांगते.
आता तिला पुढे अभिनयात करिअर करायचे नाही, असं भविष्य काळाचा विचार करताना ती सांगते.
ती म्हणते, "आता मला या क्षेत्रात काहीही करायचं नाही. त्यानं या क्षेत्राचं स्वप्नं माझ्यासाठी नेहमीकरता उद्ध्वस्त केलं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























