अफगाणिस्तानात भूकंपानंतर उद्धवस्त गावांची भयावह दृश्यं; ढिगाऱ्यात अडकले शेकडो मृतदेह
अफगाणिस्तानमध्ये बुधवारी (22जून) पहाटे झालेल्या भूकंपात 1 हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मुसळधार पाऊस, तुटपुंजी संसाधनं आणि डोंगराळ प्रदेश, यामुळे मदतकार्यात मोठी अडचण येतेय.
मातीच्या घरांच्या ढिगाऱ्यात शेकडो मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूकंपाच्या केंद्रस्थानाजवळची संपूर्ण गावं उद्ध्वस्त झाल्याचं गावकऱ्यांनी बीबीसीला सांगितलंय.
तर भूकंपावेळी घरातून लगेच बाहेर न पडता आल्याने मृतांमध्ये लहान मुलांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. सत्ताधारी तालिबानने आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचं आवाहन केलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमार्फत दुर्गम भागात वैद्यकीय आणि इतर मदत पोहोचवणं सुरू आहे. दरम्यान, अफगाणिस्तानला या संकटात सर्वतोपरी मदत करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)